S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

आज दिवसभरातील या 5 बातम्या तुमच्यासाठीही आहेत महत्त्वाच्या

सवर्ण आरक्षणाचं विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे.

Updated On: Jan 8, 2019 07:04 AM IST

आज दिवसभरातील या 5 बातम्या तुमच्यासाठीही आहेत महत्त्वाच्या

सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत

सवर्ण आरक्षणाचं विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहेलोत हे विधेयक मांडतील. तर उद्या बुधवारी राज्यसभेत हे विधेयक सादर होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत याच अधिवेशनात हे विधेयक मांडून त्याला संसदेची मंजुरी घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी संसदेचं अधिवेशन एक दिवसांनी पुढेही ढकलण्यात आलं आहे.

बेस्ट कर्मचारी संपावर


आपल्या विविध मागण्यासाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मंगळवारी रात्री 12 वाजेपासून कर्मचारी संपावर गेले आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना ऑफिस गाठण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे. बेस्टच्या व्यवस्थापनानं बोलावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्यामुळं मध्यरात्रीपासून संप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आश्चर्य म्हणजे मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला स्वतः महाव्यवस्थापक गैरहजर राहिले होते. या संपात 30 हजार कर्मचारी सहभागी होतील असा दावा बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी केला आहे.

बँक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचाही संप

सार्वजनिक बँकांच्या कर्मचाऱ्यांनी देखील आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी संप पुकारल्यामुळं आर्थिक व्यवहार खोळंबण्याची शक्यता आहे. या दोन संपात आणखी भर पढलीय ती महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण म्हणजेच वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाची. वीज कंपनीच्या खाजगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 72 तासांचा संप पुकारला आहे.

 कल्याण मध्ये सिटी पार्कचे शुभारंभ

कल्याणमध्ये सिटी पार्कच्या कामाचे शुभारंभ युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. परंतु, या कार्यक्रमाची कमालीची गुप्तता पाळण्यात आली आणि शेवटच्या क्षणी तोंडी निमंत्रण देणे म्हणजे आम्ही येऊ नये अशी शिवसेनेची इच्छा आहे, असं मत भाजप नेते व्यक्त करत आहे.

सीबीआय Vs सीबीआय प्रकरणावर सुनावणी

सीबीआयचे चीफ आलोक वर्मा यांची तडकाफडकी बदली प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलोक वर्मा यांनी आपल्या शपथपत्रात राकेश आस्थाना यांच्याविरोधात लाच घेतल्याचे ठोस पुरावे असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 07:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close