रेल्वेच्या मेगाब्लॉकपासून ते कापसाच्या भावापर्यंत या आहेत महत्त्वाच्या बातम्या

मध्य रेल्वेकडून आज सहा तासांचा जमोब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याणचा १०४ वर्ष जुना पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने हा ब्लॉक ठेवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 18, 2018 06:43 AM IST

रेल्वेच्या मेगाब्लॉकपासून ते कापसाच्या भावापर्यंत या आहेत महत्त्वाच्या बातम्या

मध्य रेल्वेकडून आज सहा तासांचा जमोब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याणचा १०४ वर्ष जुना पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने हा ब्लॉक ठेवला आहे.

या ब्लॉकमुळे लोकलच्या सुमारे 170 फेऱ्या रद्द होणार आहेत. तसंच 40 एक्स्प्रेस वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेकडून सकाळी 8 पासून ब्लॉकचं नियोजन करण्यात आलं आहे. यामुळे ठाणे ते कल्याण दरम्यानच्या लोकल फेऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ दौऱ्यावर


Loading...

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यापाठोपाठ

पंतप्रधान मोदी हे आता निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहे. पंतप्रधान मोदी आज भोपाळच्या दौऱ्यावर असणार आहे. दुपारी ३.१५ वाजता छिंदवाडा आणि संध्याकाळी 6.15 वाजता इंदूर इथं सभा घेणार आहे. त्यानंतर २० नोव्हेंबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी सभा घेणार आहे. दरम्यान, भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.


दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होणार


अंनिसचे संस्थापक डाॅ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआय १८ नोव्हेंबरपर्यंत आरोप दाखल करण्याची शक्यता आहे. 2013 मध्ये पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अटक केलेल्या लोकांविरुद्ध 18 नोव्हेंबरपर्यंत चार्जशीट दाखल करण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने आतापर्यंत या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे.


कापसाला ५७०० भाव


कापसाचा भाव ५७०० रुपया पेक्षा कमी झाल्यास कापूस आता शेतकऱ्यांचा कापूस सरकार खरेदी करणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. तसंच दुष्काळाचं कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी समुद्रात वाहून जाणारं २० टीएमसी पाणी लवकरच नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गिरणा नदीत सोडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पाचोरा तालुक्यात आयोजित कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांच्यापुढे बोलताना महाजन यांनी हे आश्वासन दिले.


उत्तराखंडमध्ये १८ नोव्हेंबरला मतदान


उत्तराखंड स्थानिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्तचंद्रशेखर भट्ट यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 84 जागांसाठी 18 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारांना 29 आॅक्टोबर निवडणुकीचे चिन्ह दिले जाणार आहे. 20

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2018 06:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...