बाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का?

बाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का?

  • Share this:

बाळासाहेब ठाकरे यांची 6 वी पुण्यतिथी


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ६ वी पुण्यतिथी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 6 व्या पुण्यतिथीच्या निमित्त हजारोंच्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क येथे जमणार आहे. शिवाजीपार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला श्रद्धांजली अर्पण करणार आहे. सकाळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सेनेचे सर्व नेते यावेळी हजर असणार आहे. त्यानंतर  उद्धव ठाकरे  महापौर बंगल्यात पत्रकार परिषद घेणार आहे.


उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला असून २५ नोव्हेंबर रोजी ते अयोध्येत जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या घोषणेमुळे विरोधकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं काय झालं असा सवाल केला. त्यामुळे अयोध्येला जाण्याआधी बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे.पंतप्रधान मोदी मालदीव दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीव दौऱ्यावर आहे. मालदीवचे नवे पंतप्रधान इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या शपथविधीला मोदी हजर राहणार आहे. राजधानी माले इथं हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी समारंभानंतर पंतप्रधान मोदी सोलिह यांच्याबरोबरही द्विपक्षीय चर्चा करतील. मालदीव इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिली भेट आहे आणि त्यांनी इंडो-मालदीव संबंधांमधील नवीन अध्यायाची सुरुवात केली आहे.मध्यप्रदेश निवडणूक : भाजप प्रसिद्ध करणार जाहीरनामा


मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. सत्ताधारी भाजप आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह

भाजपचे मोठे नेते यावेळी उपस्थितीत असणार आहे. या जाहीरनाम्यात  महिला, तरुण, शेतकरी वर्गाला समोर ठेवून तयार केल्याचं सांगण्यात येत आहे.


भाजपच्या आधीर काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्याला काँग्रेसने 'वचनपत्र' असे नाव दिले. मागील शनिवारी भोपाळमध्ये प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात जाहीरनामा जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे या जाहीरनाम्यात काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर बंदी आणण्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेसच्या आश्वासनानंतर मध्यप्रदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.नॅशनल हेराल्ड केस सुनावणी


दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने वरिष्ठ नेते मोतीलाल वोरा यांच्या याचिकेवर सुनावणीसाठी 17 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुरावे सादर करणार आहे. याची नोंद घेतली जाणार आहे.  काही दिवसांपूर्वी या वर्षाअखेरीस नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधीही लवकरच जेलममध्ये जातील त्यामुळे आगामी अखिल भारतीय काँग्रेसची बैठक तिहार जेलमध्ये होणार असल्याची टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती.


भाजपची कमल संदेश यात्रालखनऊमध्ये भाजपच्या मुख्यालयात संघटन मंत्री  सुनील बंसल यांनी  कमल संदेश बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीतून भाजपच्या राजकारणात याचा परिणाम होईल असा दावा बंसल यांनी केला आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,  प्रदेश अध्यक्ष  महेंद्र नाथ पांडे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक नेते या रॅलीत सहभागी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2018 08:10 AM IST

ताज्या बातम्या