S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

Updated On: Dec 18, 2018 07:37 AM IST

आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे - कल्याण मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे. परंतु, मोदींच्या दौऱ्यापूर्वी बॅनर युद्ध रंगलंय.मेट्रोचं श्रेय घेण्यावरुन भाजप-शिवसेनेत चढाओढ सुरू झाली आहे. तर मनचे अध्यक्ष राज ठाकरे यांना व्यासपीठावर बोलावणारी उत्तरभारतीय महापंचायत मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे.

पुणे मेट्रोचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन

कल्याणमध्ये मेट्रोचा भूमिपूजन सोहळा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला रवाना होणार आहे. संध्याकाळी 04.45 वाजेच्या सुमारास त्यांच्या हस्ते पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये पिंपरी मेट्रोच्या भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पुणे विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होतील.


अमित शहा घेणार आमदाराची बैठक

पाच राज्यातील निकालानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येणार आहे. भाजपच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाच्या आगामी ध्येयधोरणाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे इगतपुरी कोर्टात

2008 सालीचं रेल्वे भरती परिक्षेच्या दरम्यान परप्रांतीय विरोधातील आंदोलन प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे इगपुरी कोर्टात हजर होणार आहे. सकाळी वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल असून तेव्हापासून ईगतपुरी न्यायालयात हा खटला सुरू आहे.

आयपीएलचा लिलाव, कुणाला किती बोली?

इंडियन प्रिमियअर लिंग अर्थात आयपीएल 2019 च्या तयारीला लागली आहे. जयपूरमध्ये बीसीसीआयने लिलाव आयोजित केला आहे. आधी हा कार्यक्रमात बंगळुरूमध्ये होणार होता. पण आता तो जयपूरमध्ये होत आहे. या लिलावात 70 खेळाडूंवर बोली लागणार आहे त्यात 50 हे भारतीय खेळाडू तर 20 हे परदेशी खेळाडू आहे. एकूण 145.25 कोटींची हा लिलाव लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 07:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close