S M L

आजच्या या 5 बातम्या तुमच्यासाठीही आहेत महत्त्वाच्या

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्करावर झालेल्या आईडी हल्ल्यात पुण्यातील जवान मेजर शशीधरन नायर शहीद झाले

Updated On: Jan 13, 2019 06:49 AM IST

आजच्या या 5 बातम्या तुमच्यासाठीही आहेत महत्त्वाच्या

मेजर नायर यांना आज अखेरचा निरोप

सीमारेषेवर जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्करावर झालेल्या आईडी हल्ल्यात पुण्यातील जवान मेजर शशीधरन नायर शहीद झाले. शनिवारी त्यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप

काँगेसच्या सुरू असलेल्या जनसंघर्ष यात्रेचा आज समारोप होणार आहे. नागपूर इथं यात्रेची अखेरची सभा होणार आहे. यावेळी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी हजर राहणार आहे.

बेस्टचा संप सुरूच

Loading...

बेस्ट कर्मचाऱ्यांचा सहाव्या दिवशीही संप सुरूच आहे. या संपावर शनिवारीही कोणताही तोडगा निघाला नाही.

नाशकात बहुजन वंचित आघाडीची सभा

नाशिकमध्ये प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची सभा होणार आहे. त्याआधी दोन्ही नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदाच बहुजन वंचित आघाडीची सभा होत आहे.

संमेलनाचा समारोप

यवतमाळ साहित्य संमेलनालाचा आज शेवटचा दिवस आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समारोप सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2019 06:49 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close