अधिवेशनापासून ते साहित्य संमेलनापर्यंत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

अधिवेशनापासून ते साहित्य संमेलनापर्यंत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपचं महाअधिवेशन आजपासून सुरू होणार आहे

  • Share this:

भाजपचं महाअधिवेशन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपचं महाअधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व ज्येष्ठ आणि वरीष्ठ नेते या अधिवेशनाला हजर राहणार आहे.

सेना –भाजप युतीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता

शिवसेना आणि भाजपच्या युतीवर आज निर्णय़ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी भाजपच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत दिले होते. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा फाॅर्म्युला ठरला आहे, फक्त घोषणा बाकी आहे, असा खुलासा केला होता. त्यामुळे, आज दिल्लीत यावर निर्णय निघतो का हे पाहण्याचं ठरणार आहे.

मुंबई बेस्टचा संप सुरूच

बेस्ट कर्मचाऱ्यांचा चौथ्याही दिवशी संप सुरूच आहे. बुधवारी रात्री महापौर बंगल्यात पार पडलेल्या 7 तासांच्या बैठकीतही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही. या बैठकीला खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता आणि बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांच्याशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली.

साहित्य संमेलन उद्घाटन

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यानंतर मंडळाने आता हा उद्घाटकपदाचा मान एका सामान्य महिलेला दिला आहे. वैशाली सुधाकर येडे असं या महिलेचं नाव आहे. वैशाली ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आहे.  आज संध्याकाळी 4 वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तर सकाळी 8वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.

एक्सिडेंटल प्रायमिनिस्टर चित्रपट रिलीज

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारीत ‘दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपट आज रिलीज होणार आहे. या सिनेमात मनमोहन यांची भूमिका अनुपन खेर यांनी साकारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2019 07:03 AM IST

ताज्या बातम्या