राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर...वाचा आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या

राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर...वाचा आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या

आजच्या दिवसभरातील टाॅप ५ घडामोडी

  • Share this:

मराठी समाजाच्या मुद्द्यांवर कायम आंदोलन करणारे आणि परप्रांतीयांविरोधात भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहे. मुंबई आयोजित उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे. राज ठाकरे आज उत्तर भारतीय महापंचयात या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

उद्धव ठाकरे आणि गडकरी एकाच व्यासपीठावर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहे.

पुणे इंटरनॅशनल 33 वी मॅरेथॉन

दर वर्षी डिसेंम्बर महिन्याच्या पहिल्या रविवारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित केली जाते ज्यात शेकडो परदेशी खेळाडू आणि हजारो भारतीय खेळाडू भाग घेत असतात. पुणे गणेश फेस्टिव्हल,पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे सर्वेसर्वा काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी या मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.

'पिंपरी पॅटर्न'

गुंडांचा वापर करून जमीन खरेदी-विक्रीच्या व्यव्हाराशी निगडीत गुन्हेगारीवर बेतलेला "मुळशी पॅटर्न"चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील एका महाभागाने गुंडांऐवजी चक्क मंत्रालयातील ओळख दाखवत,जमीन आणि करोडो रुपये हडप केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिकमध्ये महा आरोग्य शिबीर

नाशिक येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित राहणार आहे.


===================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 07:45 AM IST

ताज्या बातम्या