S M L

भीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर

. या प्रकरणामधील पीडित मुलीच्या तक्रारीवर साधी चौकशी सुद्धा झाली नाही याबद्दल नाराजीही आंबेडकर यांनी व्यक्त केली.

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2018 04:27 PM IST

भीमा कोरेगाव : पूजा सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी -प्रकाश आंबेडकर

नागपूर, 23 एप्रिल : कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचारामधील पीडित तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या प्रकरणामधील पीडित मुलीच्या तक्रारीवर साधी चौकशी सुद्धा झाली नाही याबद्दल नाराजीही आंबेडकर यांनी व्यक्त केली.

रविवारी संध्याकाळी पीडित मुलगी पूजा सकट हिचा मृतदेह सापडला ही मुलगी कोरगाव भीमाच्या घटनेंनंतरच्या हिसाचाराच्या संदर्भात एफआयआर दाखल कऱण्यासाठी गेली होती. पण तिची तक्रार घेण्यात आली नव्हती आमच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर एफआयआर दाखल झाला.

अशा आणखी सात एफआयआर दाखल झाल्या आहेत त्यातही अद्याप चौकशी झाली नाही याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप व्यक्त केला आहे.

ती मुलगी आपल्या आईवडिलांसह राहत होती आणि तिने संपत्तीच्या वादातून आत्महत्या केली असा तर्क अयोग्य असल्याचंही अँड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 06:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close