टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने शेतातच लावून घेतला गळफास

टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने शेतातच लावून घेतला गळफास

  • Share this:

औरंगाबाद, 22 ऑगस्ट : औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. रोज येता जाता टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील तांदुळवाडी येथील ही घटना आहे.

प्रियांका मोरे असं या 17 वर्षीय तरुणीचं नाव आहे. टवाळखोरांचा रोजचा त्रास प्रियांकाला अनावर झाला आणि त्यातून तिने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. घराजवळच्या शेतात प्रियांकाने स्वत:ला गळफास लावून घेतला. या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

स्थानिकांनी शेतात प्रियांकाचा मृतदेह पाहिल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा ते तपास घेत आहेत. प्रियांका मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर या प्रकरणात प्रियांकाच्या वडिलांनी 2 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलीस प्रियांकाच्या घरच्यांची आणि स्थानिकांची देखील चौकशी करणार आहेत. तर आरोपीचा लवकरात लवकर शोध  लागावा अशी आशा प्रियांकाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

पण प्रियांकाच्या अशा अचानक जाण्याने मोरे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर गावातही भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे गाव वेशीवर बसणाऱ्या टवाळखोरांचा पोलीस लवकरात लवकर बंदोबस्त करतील अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

'ROADIES' विजेती श्वेताच्या बोल्ड फोटोजमुळे सोशल मीडियावर राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 06:03 PM IST

ताज्या बातम्या