विदर्भात वाघांची संख्या वाढली पण...

विदर्भात वाघांची संख्या वाढली पण...

देशभरात वाघांची संख्या तीस टक्क्यांनी वाढल्याबद्दल आनंद व्यक्त होतोय.त्यातच विदर्भात एकापाठोपाठ वाघांचे मृत्यू होतायत.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, 05 जुलै : देशभरात वाघांची संख्या तीस टक्क्यांनी वाढल्याबद्दल आनंद व्यक्त होतोय.त्यातच विदर्भात एकापाठोपाठ वाघांचे मृत्यू होतायत. त्यामुळे व्य्राघ्रप्रेमींमध्ये चिंता पसरलीय. विदर्भात दोन वाघांची शिकार झाल्याचं पुढे आलंय तर दोन बछड्यांचा वाघासोबतच्या झुंजीत मृत्यू झालाय.

वाघ वाचवण्यासाठी संपूर्ण देशभरात कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात मोहिम राबवली जात आहे. वाघांच्या संवर्धनामुळे देशभरात वाघांची संख्या दोन हजार दोनशे सव्वीस झालीय. टायगर कँपिटल समजल्या जाणाऱ्या विदर्भात ही संख्या ३००च्या वर आहे. पण पेंचमधील दोन वाघांच्या शिकारीमुळे वाघांची चिंता निर्माण झालीय.

नागपूरच्या पेंच प्रकल्पात मासेमारी करणाऱ्या सहा जणांना वनखात्यानं अटक करून त्यांच्याकडून दोन वाघाचे अवशेष जप्त करण्यात आलेत.

दोन वाघांची शिकार झाल्याचं पुढे आल्यावर ताडोबातील दोन बछड्यांचा वाघांसोबतच्या युद्धात मृत्यू झाल्यानं वाघांची संख्या पुन्हा कमी झालीय. तर हायकोर्टानं चंद्रपूरच्या इथल्या तथाकथित नरभक्षक वाघाला ठार मारण्याचे आदेश रद्द केल्यानं एका वाघाला जीवदान मिळालंय. मूळातच वनविभागाचा फोकस हा वाघ वाचवणं आहे की पर्यटन यासंदर्भात व्याघ्रप्रेमींनी प्रश्न उपस्थित केलेत.

वाघांची संख्या वाढत असल्याचा आनंद व्यक्त करत सरकार आपलीच पाठ थोपटून घेतंय. पण टायगर कॅपिटल असणाऱ्या आणि वनखात्याच्या मुख्यालया शेजारच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकापाठोपाठ एक वाघांचा मृत्यू होत असल्यानं दिव्याखालीच अंधार असल्याची स्थिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 12:34 PM IST

ताज्या बातम्या