काय सांगता, मतदानाची शाई दाखवा आणि मोफत करा थायरॉईड टेस्ट

महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मतदान करणा-या महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी करण्याची घोषणा क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे करण्यात आली आहे. 'मतदानाची शाई दाखवा आणि थायरॉईडची मोफत तपासणी करा', असा उपक्रम या संस्थेने सुरु केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 04:41 PM IST

काय सांगता, मतदानाची शाई दाखवा आणि मोफत करा थायरॉईड टेस्ट

नाशिक,18 एप्रिल- लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत आणि सर्वच पक्ष आपापल्या परीने पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मतदान करणा-या महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी करण्याची घोषणा क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे करण्यात आली आहे. 'मतदानाची शाई दाखवा आणि थायरॉईडची मोफत तपासणी करा', असा उपक्रम या संस्थेने सुरु केला आहे. कोणतीही महिला मतदान केल्यानंतर शहरातील पाचपैकी कोणत्याही केंद्रावर आपली थायरॉईडची मोफत तपासणी करून घेऊ शकणार असल्याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी भटेवरा-जैन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

महिलांच्या आरोग्याबरोबरच मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगातनाच सध्या वयाच्या 10 ते 14 वर्षांपासून थायरॉईड आजाराने मुली, महिला त्रस्त आहेत. साधारणत: वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आढळणारा हा आजार गेल्या काही दिवसांपासून वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच सुरू होतो. त्यामुळे थायरॉईडचे वेळीच निदान आणि उपचार वेळेवर होणे आवश्यक आहे. ब-याच वेळा महिला तपासणीसाठी जाण्याकरिता कंटाळा करतात आणि त्यात घरची जबाबदारी, आर्थिक परिस्थिती अशी अनेक कारणे आहेत, त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महिलांनी मतदान करा आणि बोटावरील मतदानाची शाई दाखवून विनामूल्य थायरॉईडची तपासणी करण्याचे आवाहन पल्लवी भटेवरा-जैन यांनी केले आहे.


VIDEO: प्रचारामुळे मुलांची भेटच नाही झाली- पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 04:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...