Elec-widget

तब्बल 50 फूट खोल विहिरीत पडूनही तीन वर्षांचे बाळ सुखरूप

तब्बल 50 फूट खोल विहिरीत पडूनही तीन वर्षांचे बाळ सुखरूप

देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय येणारी घटना महाबळेश्वरात घडली आहे. मदरशातील एक तीन वर्षांचे बाळ महाबळेश्वरात तब्बल 50 फुट खोल विहिरीत पडले. बाळ तब्बल तीन तास विहिरीत होते, बाळ सुखरूप आहे.

  • Share this:

किरण मोहिते (प्रतिनिधी)

सातारा, 27 मे- देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय येणारी घटना महाबळेश्वरात घडली आहे. मदरशातील एक तीन वर्षांचे बाळ महाबळेश्वरात तब्बल 50 फुट खोल विहिरीत पडले. बाळ तब्बल तीन तास विहिरीत होते, बाळ सुखरूप आहे. याला दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. आयान शेख असे या बाळाचे नाव असून तो मुंबईतील सायन येथील आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आयानला सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात हलवले. आयान शेख हा पूर्णपणे ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आयान शेख हा मदरशाच्या मुलांसोबत महाबळेश्वर येथे आला होता. तो लहान असल्यामुळे त्याची आईही याच्यासोबत आली होती. आयन हा इतर मुलांसोबत खेळत असताना अचानक गायब झाला. तीन तास शोध सुरू असताना जवळच्या विहिरीत पाहिले असता त्याचा नाजूकसा आवाज बाहेर आला. पोलिसांना या घटनेची माहिती दिली गेली. पोलिसानी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना बोलवले, शर्तीचे प्रयत्नानंतर आयनला बाहेर काढण्यात आले. शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आयनच्या डोक्याला तीन टाक पडले असून तो आता सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आयन पन्नास फूट खोल विहिरीत पडूनही सुखरूप असल्यामुळे हे एक आश्चर्य  मानले जात आहे.

दरम्यान, मुंबईत जोगेश्वर रेल्वेस्थानकातील एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, यात एक महिला आपल्या बाळासह ट्रेनखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. विरारहून चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या ट्रेन समोर येऊन या महिलेने जीव देण्याचा प्रयत्न केला. ट्रेनचा वेग इतका होता की मोटरमॅनला गाडी थांबवणे शक्य नव्हते. मात्र या अपघातात एक चमत्कार घडला. महिलेचा जीव गेला मात्र महिलेसोबत असलेले नवजात बाळ थोडक्यात बचालले.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना बिहारमधील बिलासपूर येथे घडली होती. एका महिलेने आत्महत्या करण्यासाठी आपल्या तीन मुलांसोबत चक्क ट्रेनसमोर उडी मारली होती. ट्रेनच्या इंजिनची जोरदार धडक बसल्याने महिलेसह तिघे मुले फूटबॉल सारखी लांबवर फेकली गेली होती. त्यापैकी 7 वर्षीय योगिता साहू या मुलीचा डावा हात आणि उजवा पाय कापला गेला. महिला आणि इतर दोन मुले जखमी झाले. पण सुदैवाने चौघांचाही जीव बचावला.

Loading...

जयरामनगरवरून बिलासपूरला येणारी मालगाडी संध्याकाळी 5 वाजता बिलासपूर रेल्वे स्टेशनवरून अंदाजे 2 किलोमीटर मागे होम सिग्नल महामाया मंदिर गणेशनगरजवळ पोहोचली होती, त्यावेळी अचानक एका महिलेने आपल्या तीन मुलांसोबत ट्रेनसमोर उडी घेतली. त्यांना ट्रेनने जोरदार धडक बसली आणि ते दूर फेकल्या गेले. यावेळी योगिता साहून या 7 वर्षीय चिमुकलीचा डावा हात कोपऱ्यापासून आणि उजवा पाय गुडघ्यापासून कापला गेला. त्यासोबतच महिला आणि वंदना साहू यांना गंभीर दुखापत झाली, तर तीन वर्षीय पुखराज साहू या चिमुकल्याला किरकोळ दुखापत झाली होती. महिला संगीता साहू (32) ही पती हगनू साहूसोबत जोबा जिल्ह्यातील महासमुंद गावाची रहिवासी आहे. पती कुलीचे काम करतो. पैशामुळे पती आणि सासू-सासऱ्यासोबत नेहमी वाद व्हायचे. दररोजच्या कटकटीला कंटाळून ती आपल्या तीन मुलांसोबत आत्महत्या करण्यासाठी बिलासपूरला आल्याचे संगीता साहू हिने पोलिसांना सांगितले.


VIDEO:महिलेने बाळासह लोकलसमोर मारली उडी; आश्चर्यकारकरित्या बचावले बाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2019 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...