नागपूर की गुन्हेपूर ?, महिन्याभरात 3 सामूहिक बलात्काराच्या घटना

नागपूर की गुन्हेपूर ?, महिन्याभरात 3 सामूहिक बलात्काराच्या घटना

नागपूरमध्ये या महिन्यात 3 सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

  • Share this:

24 एप्रिल : नागपूरला राज्याची उपराजधानी म्हटलं जातं..मात्र नागपूरमध्ये या महिन्यात 3 सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

पहिली घटना आहे नागपुरातील आमदार निवासात झालेला अल्पवयीन मुलीवरचा बलात्कार, दुसरी घटना म्हणजे भंडाऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला तर काल रविवारी रात्री नागपूरच्या सिताबर्डी परिसरामध्ये एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केलाय. या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर सुधारगृहातून पळून आलेल्या या निराधार १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी रात्रभर बलात्कार केल्याची घटना नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याच नागपुरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे  आणि या तिन्ही प्रकरणासंदर्भात त्यांनी महिला आयोगाकडून माहितीही मागवली आहे. या तिन्ही प्रकरणानंतर पोलिसांनी आणखी गतिशील होण्याची गरज असल्याच राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 02:18 PM IST

ताज्या बातम्या