S M L

महाराष्ट्रातून जुन्या नोटांची डिलिव्हरी थेट सुरतला, 1 कोटी जप्त

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार इंदूर पोलिसांनी 3 लोकांना एक कोटी रुपयांची जुन्या नोटांची रोकड घेऊन जाताना ताब्यात घेण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2018 12:35 PM IST

महाराष्ट्रातून जुन्या नोटांची डिलिव्हरी थेट सुरतला, 1 कोटी जप्त

इंदूर, 17 ऑगस्ट : एटीएसने दिलेल्या माहितीनुसार इंदूर पोलिसांनी 3 लोकांना एक कोटी रुपयांची जुन्या नोटांची रोकड घेऊन जाताना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे तिघंही औरंगाबादवरून 1 कोटी रुपये घेऊन सुरतला पळून जाण्याच्या तयारीत होते. या धाडीत 1000च्या 83 लाख आणि 500च्या 17 लाख जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

पकडलेल्या तीन आरोपींपैकी हबीब खान अहमदाबादचा राहणारा आहे. भूसावळचा सैय्यद इमरान हा एमआर आणि प्रॉपर्टी व्यवसायिक आहे. तर सुरतचा सैय्यद शोएब हा साडीच्या दुकानावर काम करतो, अशी माहिती एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी दिली आहे. एटीएसने दिलेल्या फोटोंच्या आधारे या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, या तीनही आरोपींची चौकशी केली असता त्यातून कमिशनचं प्रकरण समोर आलं आहे. मात्र ते पैसे कोणाचे होते आणि कोणाला देण्यासाठी ते सुरतला जात होते याची माहिती अद्याप हाती लागलेली नाही. पोलीस याबाबतचा कसून तपास करत आहे. नोटबंदीला वर्ष उलटलं असलं तरी जुन्या नोटांचा सुळसुळात काही थांबलेला नाही.या प्रकरणाची संपूर्ण माहिती आयकर विभागाकडे देण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण पैशांपैकी 25 टक्के रक्कम ही ते सुरतला घेऊन जात होते. मात्र तिथे पोहोचण्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का याचाही पोलीस वेगाने तपास करत आहेत.

VIDEO: सचिन तेंडुलकरने घेतले अजित वाडेकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2018 12:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close