नाशिकमध्ये एकाच रात्री तिघांची निर्घृण हत्या

बुधवारी रात्री नाशिकमध्ये झालेल्या एका टोळीयुद्धात एका टोळीने दोन नामचिन गुंडांची हत्या केली. भर रस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे यामुळे सामान्यांमध्ये दहशत आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 10:50 PM IST

नाशिकमध्ये एकाच रात्री तिघांची निर्घृण हत्या

कपिल भास्कर,नाशिक

28 डिसेंबर : बुधवारी रात्री नाशिकमध्ये झालेल्या एका टोळीयुद्धात एका टोळीने दोन नामचिन गुंडांची हत्या केली. भर रस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे यामुळे सामान्यांमध्ये दहशत आहे. नाशिक आता गुन्हांची उपराजधानी होणार का असा प्रश्न नाशिककर विचारू लागले आहेत.

नाशिकच्या राजीवनगर झोपडपट्टीला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. कारण काल रात्री या परिसरात घटनाच तशी घडली होती. झोपडपट्टीसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर गुंडांच्या टोळीनं देविदास इगे आणि दिनेश बिरासदर या दोघांची चॉपरनं वार करून निर्घृण हत्या केली.

हत्या करण्यात आलेले देविदास इगे आणि दिनेश बिरासदार या दोघांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळतेय. या दुहेरी हत्येच्या घटनेची बातमी नाशकात पसरत नाही तोच अंबड परिसरात रिक्षाचालकाला संपवण्यात आलं. जुन्या वैमनस्यातून रिक्षाचालक साहेबराव जाधवांची हत्या केल्याचं समजतंय.

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशकात एकाच रात्री 3 हत्या झाल्यानं पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Loading...

गेल्या काही दिवसांत नाशकात चेन स्नॅचिंग, घरफोडी अशा गुन्ह्यांच्या घटनांत वाढ झालीय. त्यात नव्यानं उदयास आलेल्या गुंडांच्या टोळक्यांनी डोकं वर काढायला सुरूवात केल्यानं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय. आधीच गुन्हेगारांच्या घटनांमुळं राज्याची उपराजधानी नागपूर, गुन्ह्याची राजधानी म्हणून कुख्यात झालीय. आता नागपूरनंतर नाशकाची त्यात भर पडायला नको यासाठी वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 10:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...