न्यू इयरमुळे मुंबई गोवा हायवेवर तीन दिवस अवजड वाहनांना बंदी

३ दिवस अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पण हो, हे फक्त रायगड जिल्ह्यालाच लागू आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2017 11:01 AM IST

न्यू इयरमुळे मुंबई गोवा हायवेवर तीन दिवस अवजड वाहनांना बंदी

30 डिसेंबर:  मुंबई-पुणे जुना हायवे आणि मुंबई गोवा हायवेवर, ३ दिवस अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पण हो, हे फक्त रायगड जिल्ह्यालाच लागू आहे.

आज आणि उद्या सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत रायगड जिल्ह्यातले हे दोन प्रमुख हायवे, आणि इतर प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना जाता येणार नाही. न्यूईयरच्या वेळी पुणे, कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या खूप असते. वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे.

रायगड जिल्‍ह्यातून जाणारया मुंबई - गोवा व मुंबई - पुणे महामार्गासह प्रमुख रस्‍त्‍यावरील अवजड वाहतूक 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्‍यात येणार आहे . 30 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्‍यापासून रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद असेल . 31 डिसेंबर व 1 जानेवरी रोजीदेखील ही वाहतूक बंद ठेवण्‍यात येणार असून रस्‍त्‍यातील अवजड वाहने पेट्रोल पंप तसेच धाब्‍यांवर उभी ठेवण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे . पर्यटकांच्‍या सुरक्षेसाठी समुद्र किनारी सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत जीवरक्षक तैनात ठेवण्‍याचा सुचना नगरपालिका तसेच मेरीटाईम बोर्डाला देण्‍यात आल्‍या आहेत .

पर्यटकांनी भान राखून आनंद लुटावा असे आवाहन रायगडचे जिल्‍हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 11:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...