नागपुरामध्ये पत्रकाराच्या आई आणि मुलीची निर्घृण हत्या; तिघांना अटक

भीशीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2018 05:21 PM IST

नागपुरामध्ये पत्रकाराच्या आई आणि मुलीची  निर्घृण हत्या; तिघांना अटक

नागपूर, 18 फेब्रुवारी : नागपूरमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर गुन्हा घडला आहे. उमरेड रोड परिसरात आजी आणि नातीचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उषा कांबळे आणि राशी कांबळे असं या मृत आजी आणि नातीचं नाव आहे. त्या पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई आणि नात ही त्यांची मुलगी आहे. काल रात्रीपासून त्या दोघीही बेपत्ता होत्या. दिघोरी नाक्याजवळ या दोघींचा मृतदेह सापडला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली  आहे. या प्रकरणी शेजाऱ्यांवर हत्येचा संशय घेण्यात येतो आहे. भीशीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

नागपूर टुडे या वेबसाईटचे पत्रकार रविकांत कांबळे   उमरेड रोड परिसरात राहतात. त्यांची आई आणि दीड वर्षांची मुलगी कालपासून बेपत्ता होती. त्यामुळे सापडलेले मृतदेह त्यांचेच असल्याचं स्पष्ट झाले आहे.

या आजी आणि नातीच्या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नागपूरच्या उमरेड रोज परिसरात संजुबा हायस्कूल जवळ त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे. या गंभीर आणि धक्कादायक प्रकारामुळे नागपूर परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2018 01:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...