शिर्डीत प्रसादातून गुंगीचे औषध देऊन लुटणारी परप्रांतीय महिला गजाआड

प्रसादातून गुंगाचे औषध देऊन एका वृद्धेला लुटणाऱ्या परप्रांतीय महिलेला शिर्डीतील साई मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी पकडले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 05:28 PM IST

शिर्डीत प्रसादातून गुंगीचे औषध देऊन लुटणारी परप्रांतीय महिला गजाआड

शिर्डी, 1 जुलै- प्रसादातून गुंगाचे औषध देऊन एका वृद्धेला लुटणाऱ्या परप्रांतीय महिलेला शिर्डीतील साई मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी पकडले आहे. पोलीसांनी महिलेला ताब्यात घेतले असून आणखी काही भक्तांना ति ने लुटलेय का, याचा तपास केला जात आहे.

आरती झाल्यानंतर साईमंदिराकडून दिल्या जाणाऱ्या प्रसादात गुंगीचे औषध टाकून एका महिलेने शिर्डीतील एका वृद्ध महिलेला लुटल्याची घटना 19 जून रोजी घडली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या या महिलेने एका वृद्ध महिलेला आपल्याकडील प्रसाद खायला दिला. मात्र हा प्रसाद खाल्ल्यानंतर या छबुबाईंना काही वेळानंतर गुंगी आली. पिंकी नामक झारखंड इथल्या महिलेने छबुबाईंच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि पैसे घेऊन पोबारा केला होता. बेशुद्ध पडलेल्या छबुबाईंना पोलीसांनी रूग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

19 जूनपासून पोलीस आणि साईसंस्थानचे सुरक्षा रक्षक या महिलेचा शोध घेत होते. अखेर सोमवार (1 जूलै) ही महिला पुन्हा साईमंदिर परिसरात आली असता सुरक्षा रक्षकाने तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसी खाक्या दाखवताच महिलेची चोरीची कबुली दिली आहे. पोलीसांनी तिच्याव विरोधात गुन्हा दाखल केला असून आणखी कुणाला तिने अशा प्रकारे लुटलंय का, याचा तपास सुरू असल्याचे साईमंदिराचे सुरक्षा प्रमुख मधुकर गंगावणे यांनी सांगितले.

दरोडेखोरांची टोळी जेरबंद; शस्त्रांसह 2 लाखांचा ऐवज जप्त

जालना शहरापासून जवळच असलेल्या राजूर रोडवर काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याची गाडी अडवून केलेल्या लूटमार प्रकरणातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपितांकडून शस्त्रांसह लुटीतील दोन लाखाचा ऐवज आणि गुन्हयात वापरण्यात आलेल्या 2 कार देखील जप्त करण्यात आल्या.

Loading...

राजूर येथील बाफना ज्वेलर्सचे मालक विनयकुमार बाफना आणि त्यांचा मुलगा नवनीत बाफना हे त्यांच्या स्विफ्ट कारमधून जालन्याकडे येत असताना त्यांच्या कारला ओव्हरटेक करून एका इंडिकाने घानेवाडी पाटीजवळील एका ढाब्याजवळ अडवले व पाठीमागून आलेल्या एका दुसऱ्या स्कोडा कारने धडक दिली होती.

VIDEO: माणुसकी यांना माहीतच नसेल, रुग्णाचा तासभर तडफडून मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 1, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...