S M L

हाती लागेल ते चोरणाऱ्या चोरास नांदेडमध्ये अटक

रोख रक्कम, दागिन्यांसह तो भांडी, पंखे, कपाट, टीव्ही, फ्रीज, डिश टीव्ही सगळं चोरून न्यायचा. काल त्याला नांदेड पोलिसांनी अटक केली. पण चोरलेला माल परत करण्यासाठी पोलिसांना तो मुद्देमाल मांडावा लागतो. पण इथे तर चक्क प्रदर्शनच भरवावं लागलं.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 28, 2017 09:52 AM IST

हाती लागेल ते चोरणाऱ्या चोरास नांदेडमध्ये अटक

नांदेड,28 ऑक्टोबर: नांदेडमध्ये एका चोराला अटक झालीय. हा चोर घरात दिसेल त्याच्या हाती लागेल ते चोरून न्यायचा. अगदी चमचासुद्धा. मोहम्मद हबीब असं या चोराचं नाव आहे.

रोख रक्कम, दागिन्यांसह तो भांडी, पंखे, कपाट, टीव्ही, फ्रीज, डिश टीव्ही सगळं चोरून न्यायचा. काल त्याला नांदेड पोलिसांनी अटक केली. पण चोरलेला माल परत करण्यासाठी पोलिसांना तो मुद्देमाल मांडावा लागतो. पण इथे तर चक्क प्रदर्शनच भरवावं लागलं.त्याच्या घरातून तब्बल दोन ट्रक चोरीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.टीव्ही, फ्रीज, अगदी चमचा, भांडी, मिक्सर या घरगुती वस्तुंपासून ते लॅपटॉप, कपडे असे सर्वच साहित्य हबीब चोरून न्यायचा. अख्खं घर धुवून तो सहकाऱ्यांसह पसार व्हायचा. या महाशयाने घरातील सोन्या चांदीपासून कपडे, चमचपासून भांड्यापर्यंत, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीज, कपाट, पंखा, टेबल, अगदी छतावरील डिश टीव्हीची छत्री सुद्धा चोरली. घरफोड्यांचे 27 गुन्हे या चोरट्याने कबुल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 20 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी आतापर्यंत हस्तगत केलाय. या चोरट्याचे आणखी काही साथीदार आहेत. त्याने जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर किती चोऱ्या केल्यात याचा तपास पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 09:52 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close