S M L

पुण्यात चोरट्याने केली राहत्या सोसायटीतच चोरी!

ज्या घरात चोरी केली ते कुटुंब परत आल्यानंतर त्यांना बाल्कनीच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता, घरातील १० लाख १६ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने, हिरे असा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशनला माहिती दिली.

Chittatosh Khandekar | Updated On: May 10, 2018 09:18 PM IST

पुण्यात चोरट्याने केली राहत्या सोसायटीतच चोरी!

10 मे: पुण्यातील चंदननगर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या सराईत चोरट्यानं त्याच्याच सोसायटीतील चोरी केल्याची घटना उघडकीस आलीय. सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये बाल्कनीतून प्रवेश करून या व्यक्तीनं ही चोरी केलीय .दरम्यान पोलिसांनी या चोराला अटक केली  आहे.

चंदननगर येथे जुना मुंढवा रस्त्यावर अल्टीस ड्रोम सोसायटीत सहाव्या मजल्यावर अग्रवाल राहतात. ६मेला दुपारच्या वेळेस घरात कोणी नाही याचा फायदा घेत चोरट्याने बाल्कीनीच्या दारातून आता जाऊन चोरी केली. ज्या घरात चोरी केली ते कुटुंब परत आल्यानंतर त्यांना बाल्कनीच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता, घरातील १० लाख १६ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने, हिरे असा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशनला माहिती दिली.

पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी अल्टीस ड्रोम सोसायटीमध्येच राहत असल्याचे पोलिसांना समजले.त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी तपासणी केली असता,अग्रवाल यांच्या घरातून चोरीला गेलेला ऐवज जशाच्या तसा सापडला. रीबेला याने तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे अग्रवाल यांच्या घरात चोरी करून स्पीकर चोरले होते.त्याने केलेल्या इतर घरफोड्या उघडकीस आणून आणखी ४० हजाराचा ऐवज जप्त केला.यामध्ये चंदननगर पोलिसांनी १० लाख ६७ हजार ९५० रूपयांचा ऐवज जप्त केला.रीबेला हा सराईत गुन्हेगार असून,त्याच्यावर २०१२ ते २०१५ या कालावधीत २६ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

 

हिम्मत रीबेला याची पत्नी आयटी इंजिनियर असून, ती एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरीला आहे.गेल्या दोन वर्षांपासून हे या सोसायटीमध्ये रहायला आहेत.गेल्या तीन वर्षात त्याने एकही चोरी केली नव्हती,परंतू पैशाच्या अडचणीतून त्याने ही चोरी केल्याची शक्यता आहे.रीबेला हा ज्या भागात रहातो त्याच भागात चोऱ्या करण्याची त्याची मोडस आहे.त्यामुळे त्यांनी अजून कुठे चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2018 09:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close