...मग आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, हंसराज अहिरांची डाॅक्टरांना धमकी

...मग आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, हंसराज अहिरांची डाॅक्टरांना धमकी

तुम्ही माओवाद्यांना कशाला गोळ्या देतात, मग आम्ही तुम्हाला गोळ्या घालू अशी धमकीच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी डाॅक्टरांना दिली.

  • Share this:

25 डिसेंबर : तुम्ही माओवाद्यांना कशाला गोळ्या देतात, मग आम्ही तुम्हाला गोळ्या घालू अशी धमकीच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी डाॅक्टरांना दिली.

चंद्रपूरमध्ये हंसराज अहीर यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शासकीय रुग्णालयातील मेडिकल उद्घाटन करण्यात आलं. पण, अहीर आज आले असताना काही डाॅक्टर सुट्टीवर गेल्याचं त्यांना कळालं. त्यामुळे संतापले अहिर डाॅक्टरांवर चांगलेच संतापले.

"मी केंद्रीय गृहराज्यमंत्री आहे. मी आज कार्यक्रमाला येणार हे माहिती असून सुद्धा डाॅक्टारांनी कार्यक्रमाला दांडी मारणे ही कितपत योग्य आहे ?,  माओवाद्यांना लोकशाही नको आहे. ज्या लोकांना अशी लोकशाही नको आहे. त्यांनी माओवाद्यांमध्ये भरती व्हायला पाहिजे. जा तिथे, मग आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, तुम्ही कशाला लोकांना गोळ्या देतात अशी धमकीच अहिर यांनी डाॅक्टरांना दिली.

डाॅक्टर कार्यक्रमाला गैरहजर राहिले म्हणून अहिर नाराज झाले. डाॅक्टरांना समज देण्याऐवजी अहिर डाॅक्टरांवर भलतेच भडकल्यामुळे वाद ओढावून घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 08:35 PM IST

ताज्या बातम्या