भिवंडीत ज्वेलर्स दुकानातून सोन्याचे दागिने पळवणारा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद

एका चोरट्याने सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून मालकास बोलण्यात गुंतवून सुमारे पाच लाखांचे दागिने पळवून नेले.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 05:07 PM IST

भिवंडीत ज्वेलर्स दुकानातून सोन्याचे दागिने पळवणारा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद

भिवंडी, 21 मे- शहरात चोरीच्या घटनांत वाढ होत असतानाच मुख्य बाजार पेठेतील भैरवकृपा ज्वेलर्समध्ये भरदिवसा चोरी झाली. एका चोरट्याने सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून मालकास बोलण्यात गुंतवून सुमारे पाच लाखांचे दागिने पळवून नेले.

चोरीचा हा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शहर पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या बाजारपेठेत सर्व ज्वेलर्सची दुकाने असून येथे पोलीस चौकी सुद्धा आहे. मात्र, पोलिस नसल्याने आशा चोरीच्या घटना नेहमीच घडत आहे.

गेवराई तालुक्यात तिहेरी अपघात.. पेटत्या कारमध्ये गरोदर महिलेचा होरपळून मृत्यू

3 बुरखाधारी महिलांनी सोन्याच्या बांगड्या लांबवल्या..

भिवंडीत एका ज्वेलर्समधून सव्वा लाखांच्या सोन्याच्या बांगड्या लांबवणाऱ्या 3 बुरखाधारी महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. भिवंडी शहरातील केशरबाग इथं  किरण ज्वेलर्स या दुकानात आलेल्या तीन बुरखाधारी महिलांनी हातचलाखी करीत आपल्या कडील बनावट सोन्याच्या बांगड्या ट्रेमध्ये ठेवत 38 ग्रॅम वजनाच्या 1 लाख 14 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या लांबविल्या. तब्बल दहा दिवसांनी दुकानदाराच्या लक्षात ही बाब आली. बुरखाधारी तिन्ही महिला दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून भोईवाडा पोलीस तपास करीत आहे.

Loading...

संतापजनक.. लग्नात आलेल्या गतिमंद मुलीवर 55 वर्षीय नराधमाने केला बलात्कार

सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून मंदिरातील दानपेट्या फोडल्या...

संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या वज्रेश्वरी मातेच्या देवळात दरोडा पडल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. दिनांक 10 मे रोजी आठ सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिराच्या मागील डोंगराळ भागातून रात्रीच्या सुमारास प्रवेश करून सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून मंदिरातील दानपेट्या फोडल्या. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीला अर्पण केलेलं दान या लुटारूंनी लुटून नेले.


भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...