नागपुरात चाललंय काय? तरुणांचा वर्दीतल्या माणसावर जीवघेणा वार

नागपुरात चाललंय काय? तरुणांचा वर्दीतल्या माणसावर जीवघेणा वार

सुदैवाने पोलीस काॅन्स्टेबल पद्माकर उके यांनी आरीचा वार हातावर झेलल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापती झाली

  • Share this:


प्रवीण मुधोळकर,प्रतिनिधी


नागपूर, 26 नोव्हेंबर : शहरात पेट्रोल भरताना रांगेत गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन तीन तरुणांनी पोलीस काॅन्स्टेबलवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.


जरीपटका पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेले पद्माकर उके हे पेट्रोल भरण्याकरीत जरीपटकातील पेट्रोल पंपावर सकाळी गेले होते. उके यांची आज साप्ताहिक सुट्टी असल्याने ते साध्यावेशात होते.


पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची रांग होती यातच आधी आपल्याला पेट्रोल भरू देण्याचा आग्रह करत दोन तरुणांनी उके यांच्यासोबत वाद घातला. ह्या वादाची परिणीती नंतर हाणामारीत झाली आणि हल्ला करणाऱ्या तरुणांनी फोन करुन आणखी एकाला बोलावून घेतले. या तिघांनी नंतर त्यांच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्राने उके यांच्यावर हल्ला केला.


सुदैवाने पोलीस काॅन्स्टेबल पद्माकर उके यांनी आरीचा वार हातावर झेलल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापती झाली. या घटनेनंतर आरोपी तिन्ही तरुण फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.


या संदर्भात काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.


दरम्यान, यवतमाळमध्ये आरोपीने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील एका जमादाराला आरोपीने लाकडी दांड्याने तोंडावर मारून जागीच ठार केलं तर इतर दोन पोलीस अधिकारी देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.


राजेंद्र कुलमेथे असं मृत्यू झालेल्या पोलीस जमादाराचं नाव आहे. मारेगावच्या हिवरी इथं ही घटना घडली. आरोपी अनिल मिश्राविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची टीम आरोपीच्या घरी गेली होती. त्यावेळी हल्ला करण्यात आला.


दोघांनी लाकडी दांडक्याने 3 पोलिसांवर हल्ला केला. यात 3 पोलीस गंभीर जखमी झाले. पण उपचारादरम्यान पोलीस जमादार राजेंद्र कुलमेथे यांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी पोलिसांचा नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


===================बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 08:23 PM IST

ताज्या बातम्या