अंबरनाथमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

अंबरनाथमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

  • Share this:

05 मार्च : अंबरनाथच्या वेशीवर असलेल्या नाळिंबी गावात डोंगराळ भागात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

सायंकाळी गणेश दिनकर हा तरुण हा याठिकाणी फिरण्यासाठी आला होता. त्याच वेळी अज्ञात इसमाने त्याच्या दिशेने तीन राउंड फायर केल्या. यातील एक गोळी त्याला लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

हत्येची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत चौकशी केली आणि टिटवाळा पोलिसांची हद्द असल्याने त्यांना या संबंधी माहिती दिली.

टिटवाळा पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला आहे. मात्र चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2018 11:27 PM IST

ताज्या बातम्या