'प्रेम' आणि 'अहिंसे'च्या माध्यमातून जगाला जोडणाऱ्या 'शांतीदूतां'चा सन्मान

मानवतेच्या आंतरिक शांतीच्या माध्यमातून विश्व शांतीचे स्वप्न साकार होऊ शकते अशी या संघटनेची भावना आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 05:34 PM IST

'प्रेम' आणि 'अहिंसे'च्या माध्यमातून जगाला जोडणाऱ्या 'शांतीदूतां'चा सन्मान

मुंबई 18 जून : आपापल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या, शांती आणि विश्व बंधुत्वासाठी काम करणाऱ्या सात व्यक्तींचा द वर्ल्ड पीसकिपर्स मुव्हमेंटच्यावतीने गौरव करण्यात आलाय. मंगळवारी (18 जून) रोजी वांद्रे कुर्ला संकुलातील वोक्हार्ट संस्थेच्या आवारात हा गौरव सोहोळा झाला. द वर्ल्ड पीसकिपर्स मुव्हमेंटचे संस्थापक सर डॉ हुज यांच्या हस्ते या सात शांतीदुतांचा सत्कार करण्यात आला. द वर्ल्ड पीसकिपर्स ही फेसबुकच्या माध्यमातून शांततेसाठी चालणारी सुमारे 2 लाख लोकांचा सहभाग असलेली एक चळवळ आहे. आभार,  क्षमा,  प्रेम, विनम्रता, दानत, धैर्य आणि सच्चाई या 7 शांती मूल्यांचा यात समावेश आहे. आंतरिक शांतीसाठी हे पाऊल असून मानवतेच्या आंतरिक शांतीच्या माध्यमातून विश्व शांतीचे स्वप्न साकार होऊ शकते अशी या संघटनेची भावना आहे.

हा गौरव अखंड मानवतेच्या शांतीसाठी तसेच सेवा आणि समृद्धीसाठी काम करण्यासाठी प्रतिबद्ध असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. "विश्व शांति राजदूत" म्हणून या सातजणांचा गौरव करण्यात आला असून त्यांना मानपत्र, गौरवचिन्ह, तसेच  चांदीचं एक नाणं देवून गौरवण्यात आलंय.

हे आहेत शांतीदूत

1. अर्चना कोचर (फॅशन डिजाइनर)

2. अटलांटा कश्यप (अभिनेत्री / ज्योतिषी / टैरो कार्ड रीडर)

Loading...

3. डॉ। भारती लावेकर (आमदार)

4. कनिष्क सोनी (अभिनेत्री / गायिका)

5. पीयू सरकार (लेखिका / अभिनेत्री)

6. क़ैसर खालिद (IPS अधिकारी)

7. डॉ। उत्तम वी जैन (फेडरेशन ऑफ एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र (FAM)

यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 05:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...