S M L

'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'च्या नावाखाली साक्षात विठ्ठलालाच गंडवलं!

आषाढी एकादशीला पंढरपूरात आलेल्या वारकऱ्यांची संख्या हा एक जागतिक विक्रम होता असा साक्षात्कार इंग्लडच्या इंडो ब्रिटीश कल्चरल फोरमला झाला. आणि...

Renuka Dhaybar | Updated On: Mar 2, 2018 10:54 PM IST

'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'च्या नावाखाली साक्षात विठ्ठलालाच गंडवलं!

02 मार्च : आपल्याकडे कुठल्याही वर्ल्ड रेकॉर्डचं भारी कौतूक असतं. आता हेच बघाना, आषाढी एकादशीला पंढरपूरात आलेल्या वारकऱ्यांची संख्या हा एक जागतिक विक्रम होता असा साक्षात्कार इंग्लडच्या इंडो ब्रिटीश कल्चरल फोरमला झाला. त्यांनी गर्दीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद झाल्याचं जाहीर केलं आणि वर्ल्डरेकॉर्डचं सर्टिफिकेट मंदिर समितीला दिलं.

पांडुरंगासाठी झालेल्या गर्दीचं क्रेडिट घेताना आणि ते मिरवण्यात धन्यता मानणाऱ्यांनी हे वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट कोण देतंय, त्याची विश्वासार्हता काय हे तपासण्याची साधी तसदीही घेतली नाही. त्यामुळे फोरमचे मध्यस्थ असलेल्या परमेश्वर पाटलांनी जगातल्या गर्दीच्या विश्वविक्रमाचं सर्टिफिकेट पंढरपूरला कुठल्या आधारावर दिलं हाही संशोधनाचा विषय बनला आहे.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकीत संस्थांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या अनेक संस्था देशभरात कार्यरत आहेत. पुरस्कार आणि वर्ल्ड रेकॉर्डचं आमिष दाखवून ही मंडळी अनेकांना बुक्का लावतात. प्रसिद्धीसाठी हपापलेली मंडळी असे रेकॉर्ड मिरवत फिरतात. पंढरपुरातही परमेश्वरानं भोळ्या भाबड्यांचा देव असलेल्या साक्षात विठ्ठलालाच गंडवल्याचा पराक्रम केलाय. त्यामुळे पुन्हा अशा अशा फसव्यांवर विश्वास ठेवावा का ? हाच प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2018 04:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close