S M L

चमत्कार! राखीपौर्णिमेला महिलेने दिला 4 मुलींना जन्म

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये राणी प्रमोद राठोड या महिलेने राखी पोर्णिमेच्या दिवशी चार मुलींना जन्म दिला आहे.

Updated On: Aug 26, 2018 05:22 PM IST

चमत्कार! राखीपौर्णिमेला महिलेने दिला 4 मुलींना जन्म

यवतमाळ, 26 ऑगस्ट : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये राणी प्रमोद राठोड या महिलेने राखी पौर्णिमेच्या दिवशी चार मुलींना जन्म दिला आहे. या चारही कन्या सुखरूप आहेत. राणी राठोड यांना 25 जूनला महाविद्यालयात उपचारासाठी आणण्यात आलं होते. सोनोग्राफी केल्यानंतर राणी यांच्या गर्भाशयात 4 बाळ असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी काळजी म्हणून या राणी यांना रुग्णालयातच थांबण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून राठोड पती-पत्नी दोघेही रुग्णालयात राहत होते. खरंतर एकावेळी 4 मुलींना जन्म देणं ही खूप क्वचित घडणारी घटना आहे. त्यामुळे हा एख चमत्कारच म्हणावा लागेल.

आज दुपारी 12.30 वाजता राणी यांनी या चार गोंडस मुलींना जन्म दिला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. आईसह चारही मुली सुरक्षित आहेत.

जिथे आजकल एका मुलाला सांभाळणं कठीण होतं तिथे राणी यांनी 4 मुलींना जन्म दिला आहे. त्यामुळे या चारही कन्यांना सांभळण्याचं मोठं आव्हान राणी आणि त्यांच्या कुटुंबियांवर आहे. शेतमजूरीवर राठोड यांच्या प्रपंचाचा गाडा सुरू आहे.

किंग खानला का मिळत नाहीत हाॅलिवूड सिनेमे? त्यानंच आणलं सत्य समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2018 04:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close