पंढरपूर: विठ्ठलाच्या मंदिरातील लाखोंची चिल्लर ढिगाऱ्यात पडून

विठ्ठलाच्या तिजोरीत वर्षाला 40 कोटी रुपयापेक्षा जास्त उत्पन्न येत असले तर यातही चिल्लर अर्पण करणाऱ्या गोरगरीब भाविकांची संख्याही लक्षणीय असते.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 07:40 PM IST

पंढरपूर: विठ्ठलाच्या मंदिरातील लाखोंची चिल्लर ढिगाऱ्यात पडून

विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी

पंढरपूर, 30 एप्रिल : गरिबांचा बालाजी म्हणून ओळख असलेल्या सावळ्या विठुरायाला अर्पण होणारी चिल्लर सध्या मंदिरासाठी अडचणीची ठरू  लागली आहे. ही चिल्लर इतकी वाढली आहे की ती कुठे ठेवायची आणि कोणाला द्यायची असा प्रश्न आता मंदिर प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षाला जवळपास दीड कोटीपेक्षा जास्त भाविक येत असतात. विठ्ठलाच्या तिजोरीत वर्षाला 40 कोटी रुपयापेक्षा जास्त उत्पन्न येत असले तर यातही चिल्लर अर्पण करणाऱ्या गोरगरीब भाविकांची संख्याही लक्षणीय असते.

हेही वाचा : पहिल्यांदा इथे भेटले होते विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, पहिल्याच भेटीत बोलावलं होतं घरी

यामुळेच वर्षाकाठी 50 ते 60 लाख रुपयांची चिल्लर ही मंदिराकडे जमा होत असते. यात एक रुपया, पाच रुपये, दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात दानपेटीत जमा होत असतात. बँका एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा होणारी चिल्लर स्वीकारण्यास तयार नसल्यानं गोरगरीबांकडून अर्पण झालेली लाखो रुपयांची चिल्लर सध्या मंदिरातच पोत्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहे.

Loading...

ही रक्कम बँक स्विकारत नसल्यानं भाविकांच्या रकमेचे लाखो रुपयांचं व्याज बुडत असून मंदिरातही एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवणं जिकिरीचं बनलं आहे. आता या चिल्लरचं वितरण गरजू उद्योगात देण्याचा विचार समितीचा असून कोणाला चिल्लर हवी असल्यास त्यानी मंदिर समितीशी संपर्क करण्याचं आव्हान मंदिर समितीचे लेखापरीक्षक सुरेश कदम यांनी केलं आहे.

VIDEO अक्षरमंत्र भाग 18 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - ऋ, प्र, श्री, द्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...