S M L

चौकशीनंतरही भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा -प्रकाश आंबेडकर

नरेंद्र मोदी यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन नौटंकी करू नये अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Sachin Salve | Updated On: Apr 16, 2018 07:02 PM IST

चौकशीनंतरही भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा -प्रकाश आंबेडकर

पुणे, 16 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची चौकशी झाल्यानंतरही त्यांना तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा आहे अशा शब्दात भारिप बहुजनमहासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळ यांची पाठराखण केलीय.पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणत सर्वच नेत्यांनी आणि पक्षांनी फसवणूक केली,आदिवासी आणि धनगर समाजात भांडणे लावली आता आधी सत्ता आणि मग आरक्षण असं धनगर समाजाने ठरवलं आहे. पंढरपूर ला 20 मे रोजी होणाऱ्या राज्यव्यापी धनगर मेळाव्यात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.

नरेंद्र मोदी यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन नौटंकी करू नये अशी टीकाही  प्रकाश आंबेडकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 07:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close