शेतकऱ्यांना दिलासा; 12 तारखेपर्यंत उडीद आणि मूग खरेदीची मुदत वाढवली

केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करत असलेल्या उडीद आणि मुगाच्या डाळींना १२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 2, 2018 09:24 AM IST

शेतकऱ्यांना दिलासा; 12 तारखेपर्यंत उडीद आणि मूग खरेदीची मुदत वाढवली

02 जानेवारी : राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करत असलेल्या उडीद आणि मुगाच्या डाळींना १२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ५२ हजार मेट्रिक टन इतक्या वाढीव खरेदीसाठी केंद्र सरकारनं ही मान्यता दिली आहे. त्यामुळे उडीद आणि मुगाच्या आधारभूत किमतीनुसार 12 जानेारीपर्यंत डाळींची खरेदी करता येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्रालयानं नाफेड, एसएफएसी आणि एफसीआयच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले आहे.

शेतकऱ्यांना ही मुदतवाढ द्यावी, यासाठी राज्य सरकारनं केंद्राला विनंती केली होती. त्याचा व्यवस्थित पाठपुरावाही केंद्र सरकारनं केला. या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या डाळी आता विकल्या जातील आणि त्यांना योग्य तो भाव मिळणार असल्याने आपल्या राज्यातला शेतकरी चांगलाच सुखावला आहे.

राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार या आधी 31 डिसेंबर आणि आता 12 जानेवारी अशी दुसऱ्यांदा केंद्रानं ही मुदत वाढ दिली आहे. उडीदाच्या वाढिव खरेदीसाठी 52 हजार मेट्रिक टनापर्यंत केंद्र सरकराकडून मंजुरी देण्यात आली असून उडीद आणि मूग आधारभूत किमतीत खरेदीसाठी करण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांचा थोडासा तरी दिलास मिळाला असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 09:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...