VIDEO : पक्ष्यांच्या विष्ठेचा वास येतो म्हणून झाडं तोडली, दोनशे पिल्लं हकनाक मेली

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2018 04:46 PM IST

VIDEO : पक्ष्यांच्या विष्ठेचा वास येतो म्हणून झाडं तोडली, दोनशे पिल्लं हकनाक मेली

चंद्रपूर, 11 आॅगस्ट  : चिमूर येथील हजारे पेट्रोल पंप जवळील बाबळीचे झाड तोडल्याने झाडावरील दोनशेच्या जवळपास बगळयांचा मृत्यू झाला असून पक्ष्यांची ५० ते ६० घरटी उद्धवस्त झाली. यात शेकडो पक्ष्यांची पिल्ले मृत पावली असून अनेक अंडी खाली पडल्याने फुटली. यामुळे या झाडावरील घरट्यात असणारे शेकडो बगळे आणि अन्य पक्षी आपल्या पिल्ल्यांना वाचून पोरकी झाली.

पावसाची सुरूवात झाली की, पक्ष्यांचा प्रजनन काळ सुरू होतो. त्यामुळे पावसात पक्षी झाडावर आपली घरटी बांधून त्यात अंडी घालण्यास सुरूवात करतात. त्यामुळे अनेक झाडावर मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची घरटी बघायला मिळते. वनविभाग कोट्यवधी वृक्ष लागवड करून पर्यावरण संर्वधान करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र परिसरातील नागरिकांनी पक्ष्यांच्या विष्ठेची वास येत असल्याची तक्रार नगर परिषदेकडे केली होती.

त्यामुळे परिसरातील नागरिकांची शाबासकी मिळवण्यासाठी परवानगी न घेता झाडाच्या फांद्या तोडल्या. त्यामुळे झाडावरील दोनशेच्या जवळपास बगळयांचा मृत्यू होऊन पक्ष्यांची ५० ते ६० घरटी उद्धवस्त झाल्याने शेकडो लहान पक्ष्यांची पिल्ले मृत पावली आणि अनेक अंडी खाली पडल्याने फुटले. त्यामुळे या पक्षाचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले.या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी वन्यजीव प्रेमींनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2018 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close