तूर खरेदीत राज्य सरकारची घोडचूकच, कॅगचे ताशेरे

एनसीडीइएक्सकडून स्थानिकरित्या चढ्यादराने तूर डाळ घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे सरकारवर दोन कोटींचा अतिरिक्त भार पडलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2018 07:24 PM IST

तूर खरेदीत राज्य सरकारची घोडचूकच, कॅगचे ताशेरे

मुंबई, 28 मार्च : राज्य सरकारच्या तूर डाळ खरेदीच्या अविवेकी निर्णयामुळे सरकारवर आर्थिक बोजा पडला आणि ग्राहकांना चढ्या दरानं तूरडाळ खरेदी करावी लागल्याचं सांगत कॅगच्या अहवालात सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने सवलतीच्या दरात वाटप केलेली तूर घेण्याऐवजी एनसीडीइएक्सकडून स्थानिकरित्या चढ्यादराने तूर डाळ घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे सरकारवर दोन कोटींचा अतिरिक्त भार पडलाय.

तसंच खरेदी केलेल्या तूर डाळी पैकी विकल्या न गेलेल्या साठ्यामधली डाळ सेवन योग्य राहिली नाही. यामुळे देखील सरकारचं एक कोटी 78 लाख नुकसान झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या निर्णयामुळे एप्रिल-ऑक्टोबर  2015 मध्ये  तूर डाळीचा किरकोळ भाव 82 रुपये प्रति किलोवरून 164 रुपये पर्यंत पोहचला असं या अहवालात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2018 07:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...