राज्य सरकारकडे अजूनही तूर खरेदी केंद्र सुरूच नाही !

राज्य सरकारकडे अजूनही तूर खरेदी केंद्र सुरूच नाही !

  • Share this:

02 फेब्रुवारी : सरकारनं तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी बीडमध्ये अजूनही तूर खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे खरेदी केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांना परत फिरावं लागलं.

या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र तुरीचे पीक जोमात आले. शेतात तरारून आलेली तूर पाहून यंदा चार पैसे हातात पडतील या आशेने बळीराजा खूश झाला होता. सरकारने अगोदरच तूर खरेदीला उशीर केला असताना आजपासून खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते, मात्र एक फेब्रुवारी रोजी सुरू होणारे केंद्र सुरूच झाले नाहीत.

अंबाजोगाई,केज पाटोदा कडा या ठिकाणी तूर उडीद. मुग खरेदी साठी केंद्र एक तारखेला सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले मात्र वस्तुस्थितीत एकही केंद्र सुरु झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण हेलपाटे घालावे लागले.

बीड जिल्ह्यात गेवराई,बीड वडवणी आणि परळी येथे तूर खरेदी करण्यासाठी ज्या जिल्हा औद्योगिक प्रक्रिया संस्थेला नेमले आहे त्या संस्थेच्या व्यवस्थापक बागवान यांनी खरेदी केंद्र सुरू न होण्यामागे नाफेड आणि मार्केटिंग अधिकारी यांचा दोष असल्याचे सांगत आपले हात झटकले.

राज्य सरकारने कितीही शेतकरी हिताचे आदेश काढले तरी सुस्तावलेली यंत्रणा जोपर्यंत अंग झटकून काम करीत नाही तोपर्यंत या अशा योजना धुळखतच पडणार हे नक्की. केंद्र सुरू न करणाऱ्या अशा मस्तवाल यंत्रणेवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचे भले होणार नाही हे निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 09:39 PM IST

ताज्या बातम्या