• होम
  • व्हिडिओ
  • वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा
  • वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा

    News18 Lokmat | Published On: Nov 19, 2018 02:57 PM IST | Updated On: Nov 19, 2018 03:26 PM IST

    संजय शेंडे, प्रतिनिधी,अमरावती, 19 नोव्हेंबर : अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी सुरूच आहे. आज वाळू माफियांनी तहसीलदार अभिजित नाईक यांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नाईक हे थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या सुमो गाडीचा चुराडा झालाय. धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार अभिजीत नाईक यांनी सातेफळ इथं अवैध रेतीचा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ट्रकचालकाने ट्रक न थांबवता सरळ तहसीलदारांच्या गाडीवर ट्रक नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत अभिजित नाईक जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीय सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी