पोलीस स्टेशन दाखवतो सांगून नागपुरात महिलेवर दोनदा बलात्कार

मुळची त्रिपुरा येथील रहिवासी असलेली ३० वर्षीय महिला कोईम्बतूर इथं नोकरी करते.

News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2018 05:23 PM IST

पोलीस स्टेशन दाखवतो सांगून नागपुरात महिलेवर दोनदा बलात्कार


प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी


नागपूर, 02 डिसेंबर : पोलीस स्टेशन दाखवतो असं सांगून एका आरोपीने त्रिपुरा येथून नागपुरात आलेल्या महिलेला रेल्वेस्थानकाजवळच्या झुडपात नेऊन आणि तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

मुळची त्रिपुरा येथील रहिवासी असलेली ३० वर्षीय महिला कोईम्बतूर इथं नोकरी करते. ती इंदूरला राहणाऱ्या सागर आणि ज्योती नामक मैत्रिणीसह नागपुरात आली होती. दोघे सागर आणि ज्योतीने पीडित महिलेला रेल्वेस्थानकावर सोडून ते त्यांच्या गावाला निघून गेले. मध्यरात्री १ वाजता महिलेला तिने इथं बसलेल्या एका ४० ते ४५ वयोगटातील व्यक्तीला पोलीस ठाण्याचा पत्ता विचारला. त्याने तिला पोलीस ठाणे दाखवतो, असे म्हणून रेल्वेस्थानकाबाहेर आणलं आणि बाजूच्या झुडपात नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला.

Loading...

त्यानंतर काही वेळानं आरोपीनं तिला बाजूच्या एका लॉजमध्ये नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित महिलेला सोडून दिलं. ती रेल्वेस्थानकाजवळच्या मेट्रोच्या बूथजवळ संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचं पाहून मेट्रोच्या गार्डने तिला वाहतूक शाखेच्या पोलीस कार्यालयाजवळ आणलं. तिथे तिने आपबिती सांगितल्यानंतर तेथून त्यांनी गणेशपेठ ठाण्यात फोन करून बलात्काराची माहिती दिली.

त्यानंतर गणेशपेठच्या पोलीस पथकाने तिला शुक्रवारी पहाटे ठाण्यात आणलं. एका व्यक्तीने पोलीस ठाण्याचा पत्ता सांगतो, असं म्हणून एकदा झुडपात तर दुसऱ्यांदा लॉजवर बलात्कार केल्याचं सांगताच पोलिसांना हादराच बसला. त्यांनी वैद्यकीय तपासणी आणि अन्य औपचारिकता पार पाडल्यानंतर गुन्हा दाखल केला.

पीडित महिलेचा पती लष्करात असल्याचं सांगितलं जातं आहे. तिला भाषेची समस्या असल्यानं पोलिसांना आरोपी आणि घटनाक्रम समजून घेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. त्यामुळे घटनेच्या २४ तासानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो महिलेला सोबत नेताना दिसतो आहे. त्या आधारे गणेशपेठ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

==========================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 05:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...