'मिशन शक्ती'ला परवानगी नक्की कुणी दिली? सरकारने केला खुलासा

मोदी सत्तेत आल्यानंतर पवानगी दिली असा खुलासा सरकारच्या वतीने करण्यात आलाय.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 04:40 PM IST

'मिशन शक्ती'ला परवानगी नक्की कुणी दिली? सरकारने केला खुलासा

नवी दिल्ली 27 मार्च : 'मिशन शक्ती' यशस्वी झाल्यानंतर आता त्यावर राजकारणही सुरू झालंय. भारताचं अंतराळातलं हे सर्वात मोठं यश आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झालीय. या प्रकल्पाला युपीए सरकार असतानाच मान्यता दिली होती असा दावा काँग्रेसने  केलाय तर मोदी सत्तेत आल्यानंतर पवानगी दिली असा खुलासा सरकारच्या वतीने करण्यात आलाय.

निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना यावरून राजकारण झालं नसतं तरच नवल होतं. काँग्रसचे नेते अहमद पटेल यांनी ट्विट करून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच परवानगी दिली होती असा दावा केला होता. तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा दावा खोडून काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये  या मोहिमेला परवानगी दिली होती असा खुलासा जेटली यांनी केला.
Loading...


काय आहे 'मिशन शक्ती'

देशासाठी बुधवारचा अभिमानाचा दिवस ठरला आहे. पंतप्रधान मोदींनी भारत अंतराळात महाशक्ती ठरल्याचे सांगितलं. लो अर्थ ऑर्बिटमध्ये एका फिरणाऱ्या उपग्रहाला भारताच्या अँटी सॅटेलाइटने पाडलं.  भारतानं केलेली ही कामगिरी मिशन शक्तीच्या अंतर्गत होती. भारतानं आपली ताकद दाखवण्यासाठी हे पाऊल उचललं. यामुळे भारताचे लष्कर आणखी मजबूत झालं. याचा फायदा लष्कराला झाला आहे.

अंतरिक्षात 300 किमी अतंरवरील सॅटेलाइट भारतानं उद्ध्वस्त केला. भारतानं स्वत:चाच सॅटेलाइट नष्ट केला. यातून भारतानं अंतराळातील आपली पोहोच जगातील देशांना दाखवली आहे. अंतराळातील सॅटेलाइट पाडण्यासाठी खूप शक्ती लागते. सॅटेलाइट पाडण्याचे किंवा अशा प्रकारची चाचणी ही युद्धावेळी वापरली जाते. शत्रू राष्ट्रावर धाक बसवण्यासाठी भारताने मिशन शक्ती केलं. ही चाचणी करत असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियम किंवा संधीचे भारताने उल्लंघन केलं नाही.

आताच्या काळात अंतराळ आणि सॅटेलाइटचे महत्त्व वाढलं आहे. त्याचं महत्त्व ओळखून भारताने मिशन शक्ती केलं. अंतराळात DRDO च्या शास्त्रज्ञांनी यशस्वी केलेल्या मिशन शक्ती बद्दल मोदींनी अभिनंदन केलं आहे. मिशन शक्ती एक कठिण मोहिम होती. हा पराक्रम केल्यानंतर भारत अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2019 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...