S M L

15 डिसेंबरच्या डेडलाईनच्या आधीच सगळे खड्डे बुजवल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा

77 हजार किलोमीटरच्या जिल्हा महामार्गावरील खड्डे लवकरच बुजवण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. हिवाळी अधिवेशनापूर्वीच खड्डेमुक्ती झाल्याचं पाटील यांनी जाहीर केलंय.राज्यातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा झाला होता. राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात विरोधकांनी मोठी मोहीम काढली होती.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 10, 2017 05:08 PM IST

15 डिसेंबरच्या डेडलाईनच्या आधीच सगळे खड्डे बुजवल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा

10 डिसेंबर: खड्डे बुजवण्याच्या 15 डिसेंबरच्या डेडलाईन अगोदर राज्यातल्या हायवेवरील खड्डे बुजवल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. राड्यातल्या 22 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचं काम पूर्ण झालंय.

77 हजार किलोमीटरच्या जिल्हा महामार्गावरील खड्डे लवकरच बुजवण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. हिवाळी अधिवेशनापूर्वीच खड्डेमुक्ती झाल्याचं पाटील यांनी जाहीर केलंय.राज्यातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा झाला होता. राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात विरोधकांनी मोठी मोहीम काढली होती. राष्ट्रवादीच्या नेता खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेक ठिकाणी जाऊन रस्त्यांच्या खराब स्थितीवरून आंदोलनही केलं होतं.या पार्श्वभूमीवर आता सरकारने केलेली ही घोषणा अधिकच महत्त्वपूर्ण ठरते आहे.

त्यामुळे आता राज्य सरकारच्या या दाव्यात किती तथ्य आहे हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close