पत्नीच्या प्रियकराचा खून करण्यासाठी जेलमधून पळाला होता कैदी, 12 तासांत अटक

पत्नीच्या प्रियकराचा खून करण्यासाठी जेलमधून पळाला होता कैदी, 12 तासांत अटक

शोकचे लग्न दहा वर्षांपूर्वी परभणी येथील अश्विनीसोबत लग्न झाले होते. परंतु लग्नाच्या नऊ महिन्यानंतर अश्विनीच्या चारित्र्यावर संशय घेत अशोकने तिची हत्या केली होती.

  • Share this:

अनिस शेख, (प्रतिनिधी)

देहु, 22 जुलै- पत्नीच्या चारित्र्य संशयावरून 2011 मध्ये तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी अहमदनगर येथील विसापूर कारागृहात मागील 8 वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने शौचालयाच्या बहाण्याने पलायन केले होते. पोलिसांनी त्याला 12 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहे. पत्नीच्या प्रियकराचा खून करण्यासाठी जेलमधून पळाल्याची कबुली कैद्याने दिली आहे. अशोक लक्ष्मण भाग्यवंत (वय- 32) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याची रवानगी कारागृहात केली आहे.

अशोकने शौचालयाच्या बहाण्याने पलायन केले होते. नंतर तो तळवडे तेथील रुपीनगरात आईला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांनी तिथेच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची रवानगी पुन्हा कारागृहात केली आहे.

काय आहे प्रकरण?

अशोकचे लग्न दहा वर्षांपूर्वी परभणी येथील अश्विनीसोबत लग्न झाले होते. परंतु लग्नाच्या नऊ महिन्यानंतर अश्विनीच्या चारित्र्यावर संशय घेत अशोकने तिची हत्या केली होती. याच हत्येच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यानंतर त्याची रवानगी अहमदनगर येथील विसापूर कारागृहात करण्यात आली होती.

मागील आठ वर्षांपासून अशोक विसापूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. परंतु मृत पत्नीचे अनैतिक संबंधाचा राग अजूनही त्याच्या डोक्यात आहे. पत्नीच्या प्रियकराचा खून करण्यासाठी अशोक कारागृहातून पळून गेल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. रुपीनगरात राहणाऱ्या नातेवाईकांना भेटून पैशाची जुळवाजुळव करून अशोक परभणीला जाऊन पत्नीच्या प्रियकराचा खून करणार होता. तशी त्याने कबुली दिली आहे.

औरंगाबादमध्ये 'जय श्रीराम'वरून बेदम मारहाणीसह धमकावलं, पाहा घटनास्थळावरचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 05:34 PM IST

ताज्या बातम्या