News18 Lokmat

एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता, 4 नव्या चेहऱ्यांना संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतय.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2018 07:37 AM IST

एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता, 4 नव्या चेहऱ्यांना संधी

11 एप्रिल : गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतय. त्यानुसार आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

मात्र, हे नवे चेहरे कोण असतील, याबद्दल अद्यापही फडणवीस सरकारने कोणेतही ठोस संकेत दिलेले नाहीत. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील (एसआरए) घोटाळ्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रकाश मेहता यांची गच्छंती अटळ मानली जात आहे.

त्यामुळे आता त्यांच्याजागी कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय, आणखी तीन नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणारे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार?

प्रकाश मेहतांची गच्छंती होणार का?

Loading...

- विस्तारत सर्व मंत्री जैसे थे ठेवत 4 नवीन चेहरे घेणं

- 2 कॅबिनेट 2 राज्य मंत्र्यांना दच्यु दिला तर 8 नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल.

- प्रत्येक साडेचार आमदार मागे एक मंत्रिपद हा फॉर्म्युला भाजपनं निश्चित केलाय आहे.

- त्यानुसार पश्चिम विदर्भात संजय कुटे, मुंबईत आशिष शेलार, मराठवाड्यातून एक मंत्रीपदासाठी वर्णी शक्यता आहे

- मुंबईतून आणखी एका आमदाराला संधी द्यायची असेन तर गृहमंत्री प्रकाश मेहता अथवा विष्णू सावरा यांचं पद धोक्यात येईल.

- रणजित पाटील, प्रवीण पोटे आणि विद्या ठाकूर यांच्या बाबत नाराजीचा सूर असल्याने पद टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे.

- आदीवासी मंत्री विष्णू सावरा याना पालघर लोकसभेची उमेदवारी द्यावी का यावरून पक्षात मतभेद आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2018 07:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...