घराबाहेर बोलावले.. तोंडात कोंबला बोळा अन् अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

घराबाहेर बोलावले.. तोंडात कोंबला बोळा अन् अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या मांजरवाडी येथे रशीदभाई मिठुबाई तांबोळी (वय-52) यांनी दोन तरुणांनी जुना राग मनात धरून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. रशीदभाई 60 टक्के भाजले असून त्यांच्यावर मंचर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

  • Share this:

रायचंद शिंदे, (प्रतिनिधी)

जुन्नर, 15 मे- पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या मांजरवाडी येथे रशीदभाई मिठुबाई तांबोळी (वय-52) यांनी दोन तरुणांनी जुना राग मनात धरून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. रशीदभाई 60 टक्के भाजले असून त्यांच्यावर मंचर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दोन तरुणांनी दुकानातून सिगारेट व माचीस खरेदी करण्याचा बहाणा करून रशीदभाई यांना घराबाहेर बोलावले. ते बाहेर येताच दोघांनी त्यांचे हात-पाय बांधले. त्यांच्या तोंडात बोळा कोंबला. नंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये रशीदभाई 60 टक्के भाजले आहेत.

रशीदभाई यांचं किराणा मालाचं दुकान असून पूर्वी ते मांजरवादी ग्रामपंचायतमध्ये नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वी रस्त्याचं काम सुरु होतं. रस्ता कच्चा असतानाही शेजारी राहणारे हृषीकेश लोखंडे आणि किरण जाधव यांनी त्यावरुन दुचाकी नेली. तेव्हा रशीदभाई आणि त्यांच्यात वाद झाला होता. नंतर तो सामंजस्याने मिटला खरा पण हृषिकेश आणि किरणच्या डोक्यात सुडाची भावना होती.

त्यामुळेच काल (ता. 14) मध्यरात्री एक वाजता रशीदभाई यांना फोन करुन दुकानातून सिगारेट आणि माचिस घेण्याची बहाण्याने बाहेर बोलावलं. ते बाहेर येताच त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून माचिसने पेटवले. पेट्रोलचा भडका झाल्यानंतर रशीदभाई यांनी आरडाओरडा करून सैरावैरा पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवळच बाहेर झोपलेल्या एकाने तांबोळी यांचे अंगावर गोधडी टाकून आग विझवली. तांबोळी यांना तातडीने मंचर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तांबोली यांचा मुलगा शोएब तांबोळी याने याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनला दिली. या माहिती नंतर पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोलीसांनी ऋषिकेश पोपट लोखंडे व किरण कानिफनाथ जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करत आहेत. ही घटना गावात गावठाण हद्दीतच घडली असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.


गायब झालेल्या पतीला पाहून पत्नी भडकली, नवऱ्याला मारतानाचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या