शेतकरी कर्जमाफीसाठी दलित,आदिवासींचा निधी वळवल्याचा आरोप

सरकारने जो जीआर किंवा शासन निर्णय जारी केला आहे त्यात अनुसुचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती उपयोजना यांचे प्रत्येकी 500कोटी रुपये असा उल्लेख केल्याने दलित, आदिवासी यांच्या योजनांचे 1000कोटी रुपये पळवले,चोरले अशी कडक टीका संजय दाभाडे,प्रियदर्शन तेलंग,सिद्धार्थ धेंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केलीय.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2017 11:12 PM IST

शेतकरी कर्जमाफीसाठी दलित,आदिवासींचा निधी वळवल्याचा आरोप

17 ऑक्टोबर: दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असल्याबद्दल आनंद साजरा होत असताना सरकारने दलित आणि आदिवासी योजनांचे प्रत्येकी 500कोटी रुपये वळवल्याचा आरोप करत सरकार विनाकारण समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप सामाजिक संघटना,दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.

सरकारने जो जीआर किंवा शासन निर्णय जारी केला आहे त्यात अनुसुचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती उपयोजना यांचे प्रत्येकी 500कोटी रुपये असा उल्लेख केल्याने

दलित, आदिवासी यांच्या योजनांचे 1000कोटी रुपये पळवले,चोरले अशी कडक टीका संजय दाभाडे,प्रियदर्शन तेलंग,सिद्धार्थ धेंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केलीय. तर सुराज्य सेनेचे संस्थापक सदस्य सुभाष वारे यांनीही दलित,आदिवासी यांच्या हक्काचा घास काढून शेतकऱ्यांना देऊन सरकार विनाकारण समाजात तेढ पसरवत असल्याचं म्हटलंय.

आता यावर सरकारमधले सत्तेतले भागीदार भाजप, सेना जे कर्जमाफीचं श्रेय घेत आहेत आणि कर्जमाफी मिळावी म्हणून रान उठवणारे काँग्रेस, राष्ट्रवादीसारखे विरोधी पक्ष काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सरकारमधले दलित,आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विष्णू सावरा,दिलीप कांबळे तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भूमीकेबद्दलही उत्सुकता लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 09:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...