S M L

न्यायव्यवस्था निष्पक्षच हवी,नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही-न्यायमूर्ती चेलामेश्वर

सध्याच्या पिढीतील वकील हे पैसे कमवण्याच्या आणि निवडणुकांच्या राजकारणात व्यस्त आहेत अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

Sachin Salve | Updated On: Apr 14, 2018 11:03 PM IST

न्यायव्यवस्था निष्पक्षच हवी,नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही-न्यायमूर्ती चेलामेश्वर

नागपूर, 14 एप्रिल :  देशातील न्यायव्यवस्था निष्पक्ष ठेवण्यात जर आपण कमी पडलो तर येणाऱ्या पिढ्यांना आपण सन्मानपूर्ण जीवन देऊ शकणार नाही पर्यायाने ते आपल्याला माफही करणार नाही असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती चेलामेश्वर यांनी नागपुरात व्यक्त केलंय.

नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनने न्यायमूर्ती चेलामेश्वर यांचे नागपुरात व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी  चेलामेश्वर यांनी न्यायाधीश, वकीलांचे चांगलेच कान टोचले.

सध्याच्या पिढीतील वकील हे पैसे कमवण्याच्या आणि निवडणुकांच्या राजकारणात व्यस्त आहेत अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

देशातील शिक्षा होण्याची टक्केवारी फक्त पाच टक्के आहे याचाच अर्थ असा की गुन्ह्याचा तपास एकतर योग्य होत नाही किंवा ते प्रकरणं कोर्टात सरकारी पक्षांकडून योग्य पद्धतीने मांडली जात नाही असंही न्यायमूर्ती चेलामेश्वर म्हणाले.

तपास यंत्रणा आपले काम योग्य पद्धतीने करताहेत काय तर त्याचे उत्तर नकारात्मक असल्याचे मला गुवाहाटी हायकोर्टात असतांना याचा प्रत्यय आल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading...
Loading...

न्यायपालिकाचे स्वातंत्र घटनेत लिहले आहे पण न्यायव्यवस्थेतील नेमणुकांमध्ये सरकारचा हस्तक्षेप असल्याचंही वास्तव असल्याचंही चेलामेश्वर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2018 11:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close