मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत खडाजंगी

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 02:56 PM IST

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत खडाजंगी

मुंबई, 21 जून- मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मांडली. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना अल्पसंख्याक विकासमंत्री विनोद तावडे यांनी मुस्लिम समाजातल्या मागास प्रवर्गाला आरक्षण असल्यामुळे धर्मावर आधारित आरक्षण कशाला हवे, असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांची मागणी अप्रत्यक्षरीत्या फेटाळून लावली. यावरून विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला.

सगळ्या समाजाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सरकार संवेदनशील आहे. मात्र, राज्यघटनेमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. काँग्रेस मतांसाठी डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरून भरकटली आहे. काँग्रेसने सत्तेत असताना मुस्लिमांच्या विकासासाठी काहीही केले नाही, असा घणाघाती आरोपही तावडे यांनी यावेळी केला. सरकार सर्व समाजाच्या विकासासाठी वचनबद्ध आहे, असे सांगत तावडे यांनी सभागृहाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांचे त्यावर समाधान झाले नाही. विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केला. त्यामुळे सभापतींना कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला जोरदार झटका दिसा, असा टोलाही तावडे यांनी यावेळी लगावला.

'त्या' शेतकऱ्याला तात्काळ मुक्त करा...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले.त्या शेतकऱ्याला तात्काळ मुक्त करा आणि अटकेची कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.मरीन ड्राईव्हला तो पोलीस आहे, अशी माहिती देखील मुंडे यांनी सभागृहाला दिली. मुंडे यांची मागणी मान्य करत सभापतींनी शेतकऱ्याला मुक्त करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले.सरकारने कर्जमाफी सर्टीफिकेट दिले, पण प्रत्यक्षात कर्जमाफी झाली नाही, असा आरोप मुंडे यांनी केला होता.

'पोलीस आझाद मैदान स्वत: च्या बापाचं समजतात का?'

Loading...

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-384547" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzg0NTQ3/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2019 02:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...