S M L

गांधी, आंबेडकर, विवेकानंद यांचं हिंदुत्व खरं - मोहन भागवत

राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि विवेकानंद यांनी जे सांगितलं तेच खरं हिंदुत्व आहे अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 21, 2018 10:43 AM IST

गांधी, आंबेडकर, विवेकानंद यांचं हिंदुत्व खरं - मोहन भागवत

21 मार्च : राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि विवेकानंद यांनी जे सांगितलं तेच खरं हिंदुत्व आहे अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे. तसंच संघाचं हिंदुत्व या सगळ्यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं नाही असंही ते म्हणाले.

आज हिंदुत्वाकडे आणि संघाकडे मोठ्या प्रमाणात तरूण आकर्षित होत आहेत असंही त्यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. आज हिंदुत्वाकडे तरूण वळू नये म्हणून हिंदुत्वाची बदनामी केली जाते आहे. तोडून मोडून हिंदुत्वाच्या संकल्पना सांगितल्या जात आहेत .तसंच संघाकडे वळणाऱ्या युवकांना चांगल्याप्रकारे तयार करू असंही ते म्हणाले.

आपला सत्य आणि अहिंसा या दोन गोष्टींवर प्रचंड विश्वास आहे असंही त्यांनी सांगितलं. महात्मा गांधी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि विवेकानंदांसोबत सुभाषचंद्र बोसांचं हिंदुत्वच खरं आहे असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2018 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close