डॉक्टरांनी मृत घोषित केलं.. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली आणि ती उठून बसली!

वृद्ध महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. एवढेच नाही तर डेथ सर्टिफिकेट ही दिलं. घरात रडारड सुरू झाली. नातेवाईक, मित्रमंडळींना निरोप दिले गेले. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 07:59 PM IST

डॉक्टरांनी मृत घोषित केलं.. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली आणि ती उठून बसली!

अद्वैत मेहता (प्रतिनिधी)

पुणे, 27 जुलै- वृद्ध महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. एवढेच नाही तर डेथ सर्टिफिकेट ही दिलं. घरात रडारड सुरू झाली. नातेवाईक, मित्रमंडळींना निरोप दिले गेले. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली आणि ती महिला उठून बसली, ही काही कथा नाही किंवा सिनेमा नाही. पुण्यात घडलेली घटना आहे.

पुण्यातील शिवदर्शन चौकातील चिंचोळ्या गल्लीत एका 3 मजली इमारतीत राहणाऱ्या गंगुबाई बानगुडे(वय-82) आजारपणामुळे मागील काही महिने अंथरुणाला खिळून होत्या. शुक्रवारी 26 जुलैला दुपारी त्यांच्या हालचाली मंदावल्या, डोळे निस्तेज झाले आणि घरचे कावरे बावरे झाले. फॅमिली डॉ.कल्पेश पाटील यांना बोलवण्यात आले. गंगुबाई यांची नाडी लागेना. त्या डोळे उघडेनात. त्यामुळे त्या आता आपल्यात नाहीत, त्याचे निधन झाले असे डॉ. पाटील यांनी सांगितले. दुपारचे दीड वाजले होते. घरात रडारड सुरू झाली. नातेवाईक, मित्रमंडळींना निरोप दिले गेले. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. गंगुबाई यांचा मुलगा नंदकुमार आणि कुटुंबाने देवाचा धावा सुरू केला. गंगुबाई या हालचाल करत असल्याचे जाणवले. डॉ.पाटील यांना पुन्हा बोलवण्यात आले. डॉक्टरांनी गंगुबाईंची प्राणज्योत मालवली असल्याचे सांगितले. तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. रात्री 8 वाजता अंत्यसंस्काराची वेळही ठरवण्यात आली. या भागातील नगरसेवक आबा बागूल आणि त्यांचा मुलगा अमित भेटीला आले. संध्याकाळच्या सुमारास आजीबाई अचानक उठून बसल्या. हे पाहून आजीबाईचा मुलगा नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, नरसेवक आबा बागुल आणि डॉ.कल्पेश पाटील यांना आश्चर्याचा धक्का बसला. मेडिकल सायन्य हे मान्य करत नसले तरी ते अगाध आहे. चमत्कारापेक्षा कमी नाही, असे उद्गार सगळ्यानी काढले. देव तारी त्याला, कोण मारी, असेच म्हणावे लागेल. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असते,याची प्रचित या घटनेवरून आली.

कल्याणमध्ये पेट्रोल पंपच बुडाला पाण्याखाली, 9 जणांची अशी झाली सुटका LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2019 07:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...