बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख

बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रिपदे, उंचावेल विकासाचा आलेख

जयदत्त क्षीरसागर यांनी शपथ घेतातच फाटक्याची आतशबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवला.

  • Share this:

बीड, 16 जून- नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिपद विस्तारात दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाल्याने बीड जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी शपथ घेतातच फाटक्याची आतशबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवला. बीडच्या इतिहासामध्ये जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळण्याची पहिलीच वेळ आहे. बीड जिल्ह्यात तब्बल 24 वर्षांनंतर शिवसेनेला मंत्रिपद मिळाल्याने 'अच्छेदिन' आले आहेत.

दिवंगत केशर काकू क्षीरसागर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी बीड जिल्ह्याचे राजकीय नेतृत्त्व राज्यस्तरावर केले. मात्र, एकाच वेळी बीड जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्री पदे बीडच्या राजकीय इतिहासात कधीच मिळालेले नाहीत. यावेळी शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने बीडच्या वाट्याला 2 कॅबिनेट मंत्रिपदे आली आहेत. त्यामुळे विकासाचा आलेख दुपटीने उंचावेल, अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आहे.

एकेकाळी डझनभर आमदारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना बीड जिल्ह्याला एकाच वेळी 2 कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली नव्हती. 1395 ते 1998 यादरम्यान बीड जिल्ह्यात 2 राज्यमंत्री आणि 1 कॅबिनेट मंत्रिपद होते. त्यादरम्यान लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद होते. तर सुरेश नवले आणि जयसिंग गायकवाड राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. मात्र यावेळी चार महिन्यासाठी का? होईना पण कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. यामुळे बीड जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

'आवाज कोणाचा शिवसेनेचा'

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर शपथ घेताना 'आवाज कोणाचा शिवसेनेचा' अशी घोषणाबाजी करण्यात आली. जयदत्त क्षीरसागर त्यांचे कुटूंबीय आणि समर्थक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यानंतर शेलारांच्या वेळीही 'भाजप जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, विखे पाटील यांना सार्वजनिक बांधकाम, आशिष शेलार यांना गृहनिर्माण, अनिल बोंडे यांना कृषी, डॉ. संजय कुटे यांना समाज कल्याण, सुरेश खडे यांना आदिवासी विकास, अशोक उईके यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली जाणार आहे.

प्रकाश मेहतांसह या मंत्र्यांची राजीनामे..

दुसरीकडे, प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.

असा आहे नवा फॉर्म्युला..

मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला 1021 असा आहे. भाजपला 10, शिवसेनेला 2 तर रिपाइंला एक अशी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, शिवसेनेकडून नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे.

या नेत्यांची मंत्रिपदी लागली वर्णी..

कॅबिनेट मंत्री

-राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

-जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)

-आशिष शेलार (भाजप)

-संजय कुटे (भाजप)

-सुरेश खाडे (भाजप)

-अनिल बोंडे (भाजप)

-तानाजी सावंत (शिवसेना)

-अशोक उईके (भाजप)

राज्यमंत्री

-योगेश सागर (भाजप)

-अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट)

-संजय (बाळा) भेगडे (भाजप)

-परिणय रमेश फुके (भाजप)

-अतुल सावे – (भाजप)


VIDEO: जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2019 02:52 PM IST

ताज्या बातम्या