Elec-widget

औरंगाबादेत अज्ञातांनी शाळेला लावली आग, शालेय साहित्य जळून खाक

औरंगाबादेत अज्ञातांनी शाळेला लावली आग, शालेय साहित्य जळून खाक

उन्हाळी सुटी संपून शाळा सुरू होऊन आठवडाही उलटला नसतानाच अज्ञात व्यक्‍तींनी चिकलठाणा येथील एका शाळेला आग लावल्याची घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली.

  • Share this:

औरंगाबाद, 19 जून- उन्हाळी सुटी संपून शाळा सुरू होऊन आठवडाही उलटला नसतानाच अज्ञात व्यक्‍तींनी चिकलठाणा येथील एका शाळेला आग लावल्याची घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेत तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्‍यात आली.

मिळालेली माहिती अशी की, चिकलठाणा येथील पोलिस स्टेशनसमोर अभिनव इंटरनॅशनल स्कूल आहे. या स्कूलमध्ये पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर सोमवारपासून शाळेस सुरू झाली होती. आठवडा उलटत नाही तोच मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्‍तींने शाळेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्याने शाळेतील काही कागदपत्रे बाहेर फेकून इतर साहित्याला आग लावली. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच याची माहिती मिळताच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्‍यात आली. मात्र, यात शालेय साहित्य जळून खाक झाले. या घटनेनंतर शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनीही धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

फायटरने मारहाण

पूर्ववैमनस्यातून दोघांनी शेख अर्शद शेख अब्दुल रशीद (रा. रहेमानिया कॉलनी) यांना मारहाण केली. याप्रकरणी सोहेल (वय-19), शोएब (वय-18) यांच्याविरुद्ध जिन्सी पोलिसात गुन्हा दाखल केला. ही घटना 13 जून रोजी रात्री गुलशन पान सेंटरजवळ घडली होती.


Loading...

SEPCIAL REPORT: बैल पोळ्याच्या दिवशी इथे करतात गाढवांची पूजा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2019 10:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com