साप चावल्याने 'मृत' घोषीत केलेल्या मुलीला बापाने सोडवलं मृत्यूच्या तावडीतून

साप चावल्याने 'मृत' घोषीत केलेल्या मुलीला बापाने सोडवलं मृत्यूच्या तावडीतून

उपचारापेक्षाही खुशीच्या वडलाने घेतलेली मेहनत आणि दाखवलेल्या आत्मविश्वासामुळे लेकीचे प्राण वाचल्याची पावती खुद्द डॉक्टरांनीच दिली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड 25 जुलै : दुर्गम खेड्यात वास्तव्य, घरातलं दारीद्र्य, वाहतुकीच्या साधनांचा अभाव, गावात डॉक्टर नावापुरतेच अशा परिस्थितीत विषारी साप चावल्याने मुलगी बेशुद्ध पडली...नंतर डॉक्टरांनी तीला मृत घोषीत केलं मात्र पोटच्या पोरीवरच्या प्रेमानं खिशात दमडी नसतानाही त्या बापानं जीवाचं रान केलं आणि त्या मुलीचे प्राण वाचले. असामान्य धैर्य दाखविणाऱ्या त्या पित्याच्या जिद्दीच्या कहाणीला खुद्द डॉक्टरांनीही आता सलाम केलाय.

व्यापाऱ्यांच्या तिजोरीवर बँक अधिकाऱ्यांचा डल्ला, 238 कोटींचा अपहार उघड

मनोज तींडोरे हे आपल्या कुटुंबासह तळेगाव जवळच्या कान्हे या खेड्यात राहतात. खुशी ही त्यांची लाडकी कन्या. मनोज हे मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवतात. सगळ्या घराचाच आनंद असलेल्या खुशीला रात्री झोपेत असतानाच विषारी सापाने दंश केला. ही बाब तिच्या वडलांच्या लक्षात आली. मात्र तळेगाव जवळील कान्हे या खेडे गावात राहत असल्याने उचारासाठी त्यांना अनंत अडचणी आल्या. त्यांना तिथल्या शासकीय रुग्णालयातल्या अपुऱ्या साधनांमुळे वेळेत उपचार मिळाले नाही. आणि खुशी कोमात गेली. मात्र बापानं आपली जिद्द सोडली नाही,  खुशीला वाचविण्यासाठी जीवाचं रान केलं आणी अखेर तिचा जीव वाचवला.

क्रेडिट कार्डमुळं संपलं पतीचं 'क्रेडिट', 'गर्लफ्रेंड'सोबत मौज केल्याचं झालं उघड

खुशीला ज्या मण्यार जातीच्या अतिविषारी सापाने दंश केला होता. हा साप नागापेक्षाही 15 पट अधिक जहाल विषारी आहे. काळसर-निळसर रंगाच्या शरीरावर शेपटीकडे अधिक गडद होणाऱ्या पांढऱ्या पट्टयांची जोडी असते. डिवचला गेला तर सक -सक असाआवाज करून आंदोलनात्मक पावित्रा घेत तो दंश करतो. त्यामुळे बेंबी जवळ असह्य वेदना होतात आणि तातडीने उपचार झाले नाहीत तर प्राण जातो.

पुणे महापालिकेने सल्लागारांवर 9 वर्षांत केली 64 कोटींची उधळपट्टी

रात्रभर अनेक दवाखान्याचे उंबरठे झिजवल्या नंतर अखेर भूषण जगताप-देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यासाठी देवासारखे धावून आले. भूषणणे त्यांना अखेर एका दवाखाण्यात दाखल होण्यास मदत केली. खुशीला पिंपरी चिंचडच्या 'सूर्या हॉस्पिटलमध्ये' भरती केलं आणि तब्बल अठ्ठेचाळीस तास कोमा मध्ये गेलेली खुशी डॉक्टरांनी केलेल्या उपचाराने मृत्यूवर मात करू शकली. मात्र उपचारापेक्षाही खुशीच्या वडलाने घेतलेली मेहनत आणि दाखवलेल्या आत्मविश्वासामुळे डॉक्टरांनाही बळ मिळालं. आधी या मुलीला मृतच घोषीत केलं होतं मात्र तिच्या वडिलांनी तीला यमाच्या दारातून सोडवून आणलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या