जुन्नर तालुक्यात वीज अंगावर पडून युवकाचा होरपळून जागीच मृत्यू

जुन्नर तालुक्यात वीज अंगावर पडून युवकाचा होरपळून जागीच मृत्यू

येडगाव येथील भोरवाडी येथे मंगळवारी पहाटे 3 वाजता वीज अंगावर पडून एका युवकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. महेश दशरथ भोर असं मृत युवकाचे नाव आहे.

  • Share this:

जुन्नर, १६ एप्रिल-  येडगाव येथील भोरवाडी येथे मंगळवारी  पहाटे 3 वाजता वीज अंगावर पडून एका युवकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

महेश दशरथ भोर असं मृत युवकाचे नाव आहे. महेश हा  पडवीत झोपला होता. तितक्यात विजांचा कडकडाट सुरु झाला. तो घरात जात असताना वीज कोसळली आणि यामध्ये महेशचा होरपळून मृत्यू झाला. नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके,पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. भोर कुटुंबीयांच सांत्वन करण्यात आलं. महसूल विभागाकडून मदत करण्याचं आवाहन केलं आहे.


बीडमधील हाच तो VIDEO, ज्यामुळे पंकजा मुंडे सापडल्या वादात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 01:54 PM IST

ताज्या बातम्या