WhatsAppच्या माध्यमातून एकत्र आलेल्या तरुणांनी केली 'जलक्रांती'

WhatsAppच्या माध्यमातून एकत्र आलेल्या तरुणांनी केली 'जलक्रांती'

WhatsAppच्या माध्यमातून एकत्र आलेल्या तरुणांनी 'चाळीसगाव विकास मंच' नावाचं व्यासपीठ उभारलं. याच व्यासपीठामुळे तरुणांना दुष्काळी भागात जलक्रांती घडवून आणण्याचे बळ मिळालं.

  • Share this:

प्रफुल साळुंखे, जळगाव 25 जुलै : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हा कायमस्वरुपी दुष्काळी असलेला तालुका. दुष्काळ ही ओळख पुसण्यासाठी काही तरुण गेली 4 वर्ष संघर्ष करताय. या संघर्षाला अखेर यश आलाय. जलसंधारणची केलेली काम आणि वरुणराजने दिलेली साथ यामुळे तालुक्यातील खेडगावसह पंचक्रोशी च्या 5 गावातील कोरड्याठाक असलेल्या विहिरीदेखील जिवंत झाल्या. WhatsAppच्या माध्यमातून एकत्र येत तरुणांनी ही जलक्रांती केलीय.

चाळीसगाव तालुक्याची 'दुष्काळी तालुका' ही ओळख पुसण्यासाठी खेडगाव, खेडी, दस्केबर्डी, पोहरे आणि कळमडू या गावांमधील तरूण 'चाळीसगाव विकास मंच'च्या माध्यमातून एकत्र आले. जलसंधारणाची कामे केल्याशिवाय दुष्काळावर मात करता येणार नाही, ही बाब त्यांनी ग्रामस्थांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरुवातीला खूप अडचणी आल्या, विरोध झाला, अनेकांनी टीका केली, दडपण आणलं गेलं. पण जिद्दीने पेटलेली तरुणाई मागे हटली नाही.

मुख्यमंत्र्यावरील प्रेम कमी होईना, काँग्रेसचे 'पाटील' कुटुंब वर्षा बंगल्यावर

कुठलेही पद किंवा सत्ता नसताना उराशी बाळगलेले ध्येय गाठण्यासाठी काम करत राहिली. पुढे ग्रामस्थांची साथ मिळाल्यावर शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा लाभ पदरात पाडून घेतला. लोकसहभागातून पाचही गावांच्या शिवारात असलेल्या नारळी आणि उतावळी या दोन्ही नद्यांचे प्रत्येकी चार-चार किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण केले. पांझण डाव्या कालव्यासह परिसरातील 27 लहानमोठ्या नाल्यांचेही खोलीकरण करत त्यावर बंधारे बांधले.

नारळी आणि उतावळी नदीवर साखळी पद्धतीने 11 मोठे बंधारे बांधले. मात्र विधायक काम करणाऱ्या तरुणाईची वरूणराजाने कसोटी घेतली. जलसंधारणाच्या कामांचे 2 टप्पे पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षे पाऊसच पडला नाही. तरीही नाउमेद न होता तरुणांनी काम सुरूच ठेवले. शेवटी त्यांच्या कष्टाला फळ मिळाले. यावर्षी दमदार पाऊस झाल्याने दोन्ही नद्या, बंधारे, नाले पाण्याने तुडूंब भरलेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबादेतील विवाहितेवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार

चाळीसगाव विकास मंचच्या माध्यमातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आज खेडगाव, खेडी, दस्केबर्डी, पोहरे आणि कळमडू या गावांमधील साडेचार हजार हेक्टर शेतीक्षेत्र ओलिताखाली आलं आहे. नारळी आणि उतावळी नद्यांवरील साखळी बंधारे तसच लहानमोठ्या नाल्यांमध्ये 32 कोटी लीटर पाण्याचा साठा झालाय. त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतीला होणार असून पाचही गावातील 8 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. विशेष बाब म्हणजे, यापूर्वी वर्षानुवर्षे कोरड्या असलेल्या सुमारे 2 हजार विहिरी देखील जिवंत झाल्या आहेत. त्यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागलाय.

साप चावल्याने 'मृत' घोषीत केलेल्या मुलीला बापाने सोडवलं मृत्यूच्या तावडीतून

व्हॉट्सऍपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या तरुणांनी चाळीसगाव विकास मंच नावाचं व्यासपीठ उभारलं. याच व्यासपीठामुळे तरुणांना दुष्काळी भागात जलक्रांती घडवून आणण्याचे बळ मिळालं. कर्मभूमीचे पांग फेडण्याच्या जिद्दीने पेटलेले हे तरुण इथेच थांबले नाहीत. आपल्या गावांमध्ये शिक्षण, आरोग्याच्या मूलभूत सुविधा तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. गावाच्या प्रगतीला अडसर आणणाऱ्या शक्तिंविरोधातही ते संघर्ष करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 09:45 PM IST

ताज्या बातम्या